yuva MAharashtra सांगलीतील झुंजार पत्रकार शिवराज काटकर राष्ट्रीय निर्भीड पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित !

सांगलीतील झुंजार पत्रकार शिवराज काटकर राष्ट्रीय निर्भीड पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित !


(फोटो सौजन्य  : सांगली दर्पण)

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १२ डिसेंबर २०२
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष तसेच तरुण भारत चे जेष्ठ पत्रकार शिवराज आप्पासाहेब काटकर यांना ईगल फाउंडेशन च्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय निर्भीड पत्रकारिता पुरस्कार यांना नुकताच प्रदान करण्यात आला. 

शिवराज काटकर यांनी गेली तीस वर्षे पत्रकार क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरी केली असून, अन्यायाला माझ्या फोडण्याचे काम त्यांनी लेखणीद्वारे केले आहे. इतकेच नव्हे तर पत्रकारांवरील हल्ले असोत, किंवा त्यांना आवश्यक असलेली कोणतीही मदत, शिवराज काटकर हे नेहमी आघाडीवर असतात. पत्रकार क्षेत्रात ते शिवराज दादा म्हणून परिचित आहेत.


पत्रकारांच्या आरोग्यासाठी त्यांची नेहमीच धडपड असते. यासाठी वेळोवेळी ते सांगली जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित डॉक्टरांच्या सहयोगाने आरोग्य शिबिरांचे आयोजन करीत असतात. निर्भीड, स्पष्टवक्ते म्हणूनही ते ख्यातकीर्त आहेत. 

ग्रामीण पत्रकार व शहरी प्रकारांसाठी विविध आरोग्य शिबिरे, पत्रकार हल्ला विरोधी कायद्याच्या अंमलबजावण्यासाठी शासन पातळीवर सातत्यपूर्ण पाठपुरावा, पत्रकार सन्मान निधी लढाईचे नेतृत्व, शिवराज काटकर यांनी केले आहे. आपल्या समृद्ध लेखणीने त्यांनी लिहिलेले अभ्यास पूर्ण अग्रलेख व लेख संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहेत. 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व राजकीय चाणक्य म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांच्या एका पुस्तकातील ' सांगली जिल्ह्यासाठी शरद पवारांचे योगदान' हा त्यांचा लेख सर्वांनाच भावला. पत्रकारांसाठी अविरत झटणारे नेतृत्व, विविध कार्यातून सामाजिक उन्नतीसाठी त्यांची धडपड याची दखल घेऊन कोल्हापुर येथील ईगल फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात येणारा राष्ट्रीय निर्भीड पत्रकार पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला. 

संजय घोडावत इंटरनॅशनल अतिग्रे येथे एका शानदार कार्यक्रमात माजी खासदार निवेदिता माने, उद्योजक एन. सी. संघवी, सनदी लेखापाल डॉ. शंकर अंदानी, कराडचे नेते प्रवीण काकडे, ईगल फाउंडेशनचे विलासराव कोळेकर, सौ शालन कोळेकर, उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुडेलकर, तहसीलदार सुशील बल्हेकर, कोल्हापूर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल उपाध्ये, उद्योगपती संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे प्राचार्य रवी हजारे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या पुरस्काराने शिवराज काटकर यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोचण्यात आला असून, पण या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.