yuva MAharashtra भरधाव प्रवाशी जीपने दुचाकीला धडक दिल्याने मातेसह दोन लेकरांचा मृत्यु !

भरधाव प्रवाशी जीपने दुचाकीला धडक दिल्याने मातेसह दोन लेकरांचा मृत्यु !


(फोटोसौजन्य : दै. सकाळ)

| सांगली समाचार वृत्त |
तासगाव - दि. १२ डिसेंबर २०२
सांगली-तासगाव रस्त्यावरील कुमठे फाटा परिसरातील वळण रस्त्यावर भरधाव प्रवाशी जीपने दुचाकीला घडक दिल्याने मातेसह तिच्या दोन लहानग्या लेकरांबा जागीच मृत्यू झाला. पती गंभीर जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळी सव्वादहाच्या सुमारास हा अपघात झाला. काळीज पिळवटणाच्या या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

मयतामध्ये दिपाली विश्वास

म्हारगुडे (वय २७) त्यांचा मुलगा सार्थक (वय ७) आणि राजकुमार (वय ५, रा. आंबा चौक, यशवंतनगर) यांचा समावेश आहे. दुचाकीस्वार विश्वास दादासो म्हरगुडे (३९) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर जीप चालक नितेश उर्फ नाटया कोळेकर (रा. तासगाव) हा पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.


जखमी विश्वास म्हरगुडे हे सांगलीत हमाली व मोलमजुरी करतात. ते मुळचे तळेवाडी (ता. आटपाडी) येथील आहेत. कामानिमित्त ते सांगलीतील आंबा चौक परिसरात राहण्यास आहेत. तळेवाडी येथील एका वाडीत नातेवाईकाचा बुधवारी लगसोहळा होता. त्यानिमित्ताने कालपासून विश्वास हा पैशांची जुळणी करत होते. पैशांची जुळणी झाल्यानंतर सकाळी नऊ वाजता ते आणि पत्नी मुलांसह दुचाकी (एमएच १० एएच ८७३२) वरून तासगाव मार्गे निघाले होते. कुमठे फाटपाजवळील एका पेट्रोपंपाजवळ काळाने त्यांच्यावर घाला घातला. समोरून सांगलीच्या दिशेने प्रवासी जीप (एमएच १० के ०४९५) भरधाव वेगाने येत होती. जीप बालकाने ओव्हरटेक करण्यासाठी जीप रस्त्याच्या विरुद्ध बाजूला घेतली. तेव्हा समोरून येणाऱ्या दुचाकीचालक विश्वास याला अंदाज आला नाही. क्षणात दोघांची समोरासमोर घड़क झाली. अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला होता. दुबाकीचे चाक मोडून पडले होते. यावेळी मागे बसलेल्या पत्नी दिपाली यांना डोक्याला गंभीर मार लागला. त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सार्थकच्या गळ्याला पत्रा कापला, तर राजकुमारच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने दोघांचाही मृत्यू झाला. तर विश्वास यांच्या मार लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्या पडले.

दरम्यान, अपघातानंतर संशयित चालक कोळेकर हा घटनास्थळावरून पसार झाला. परिसरात बध्यांची मोठी गर्दी होती. लोकांनी तातडीने अपतकालीन रूणवाहिकेस कॉल दिला. रुणवाहिका दाखल होताच विश्वास यास तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आला. अन्य तिघांचे मृतदेहही रूग्णालयात दाखल केले.

उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. रुग्णालय परिसरात मोठी गर्दी होती. दरम्यान, जखमी विश्वास याचा भाऊ दशरथ याने फिर्याद दिली. त्यानुसार जीप चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

रुग्णालय परिसरात आटपाडीवरून नातेवाई धावले. विश्वासच्या सासरची मंडळीही आली होती. त्यावेळी प्रत्येकजणाचे डोळे पाणावले होते. तेवढ्यात जखमी अवस्थेत विश्वासला उपचारासाठी बाहेर काढण्यात आले होते. त्याची अवस्था पाहुन नातेवाईकांनी मोठा हंबरडा फोडला. मात्र, दिपाली आणि ती लेकरं का दिसेनात, असे प्रत्येकालाच वाटत होते. त्यांचा मृत्यू झाल्याचे कोणालाही माहिती नसल्याने भाबड्या आशेने नातेवाईक प्रतिक्षा करत होते. यावेळी उपस्थितांचेही डोळे पाणावले. अखेर सायंकाळी त्या तिघांचा मृत्यू झाल्याचे सांगितल्यानंतर रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी हंबरडा फोडला.

दुचाकीस्वार विश्वास म्हारगुडे याने हेल्मेट घातले होते. त्यामुळे जोरदार धडकेनंतरही ते बचावले. मात्र त्याच्या पायाला, पोटाला गंभीर दुखापत झाली आहे. हेल्मेटमुळे विश्वास वाचला, अशी घटनास्थळी एकच चर्चा सुरू होती.

म्हारगुडे कुटुंबात दोन मुलं. विश्वास हा हमाली करतो. तर त्याच्या भाऊ दशरथ ऊस तोडी करतो. त्याला भावाचाही काही वर्षांपुर्वी विवाह झाला होता. त्याला दोन मुली अन् विश्वासला दोन मुलं होती. तीच दोन मुलं कुटुंबाचा आधार म्हणून पाहिली जात होती. त्यामुळे आजी-आजोबांना नातवांचा लळा होता. पण नियतीने क्रूर घाला घालत, म्हारगुडे कुटुंबियांपासून या मुलांना दूर केले. कोवळ्या मुलांचे कलेवर पाहुन सारेच स्तब्ध झाले होते.