| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ डिसेंबर २०२४
स्वेच्छा निवृत्त, सेवानिवृत्त सफाई कामगारांच्या ३७ वारसांना लाड-पागे शिफारशीनुसार समितीच्या महापालिकेत चतुर्थश्रेणी पदावर नियुक्ती आदेश  मा शुभम गुप्ता आयुक्त  यांच्या हस्ते देण्यात आले आहेत.
या वेळी ३७ कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना  सर्वांनी चांगले  काम करून  आदर्श निर्माण करावा. आपले शहर स्वच्छ करण्यासाठी मना मनापासून प्रामाणिकपणे काम करावे, पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील यावेळी शुभम गुप्ता यांनी दिल्या आहेत.
लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना महापालिकेत वारसा हक्काने नियुक्ती दिली जाते. सफाई कामगार निवृत्त झाल्यास अथवा स्वच्छा निवृत्ती घेतल्यास अथवा काम करण्यास सक्षम नसल्यास त्यांच्या वारसाला नियुक्ती देण्याबाबत शासन निर्णय आहेत.त्या नुसार महापालिकेकडे ४५ अर्ज आलेले होते. कागदपत्र पूर्ततेनुसार ३७ वारसांना महापालिका सेवेत चतुर्थश्रेणी पदावर नियुक्ती आदेश काढण्यात आला आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे नियुक्ती आदेश  देण्यात आले नव्हते आज सदरचे आदेश देण्यात आले आहेत.
आचारसंहिता संपताच नियुक्ती आदेश जारी करण्यात आला आहे. यामुळे वारसामधून समाधान व्यक्त होत आहे.
उप आयुक्त वैभव साबळे  यांच्या नियंत्रणाखाली आस्थापना विभाग कार्यरत आहे, सहा आयुक्त आस्थापना  विनायक शिंदे यांनी सदरच्या नियुक्ती वेळेत होण्यासाठी प्रयत्न केले  आहेत , या वेळी अति आयुक्त रविकांत अडसूळ,  डॉ. रवींद्र ताटे, मुख्य लेखा परीक्षक शिरीष धनवे ,  मुख्य लेखापाल अभिजित मेघडे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते  शिवसेना जिल्हाप्रमुख महिंद्र चांडाळ, रमेश लाड अध्यक्ष शिवराज्य सफाई  कर्मचारी संघटना, पेदाना मद्रासी, माणिक गोधळे, स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील, युसूफ बारगीर उपस्थितीत होते.


