yuva MAharashtra सर्वच QR कोड सारखेच दिसतात, मग पैसे वेगवेगळ्या अकाउंटमध्ये कसे जातात ? ठाऊक आहे या मागचे गमक ?

सर्वच QR कोड सारखेच दिसतात, मग पैसे वेगवेगळ्या अकाउंटमध्ये कसे जातात ? ठाऊक आहे या मागचे गमक ?


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३ नोव्हेंबर २०२
आजकाल किराणा, भाजीपाल्यापासून ते पेट्रोल भरेपर्यंत सगळीकडे क्यूआर कोडचा वापर करून पैसे देता येतात. फक्त एक कोड स्कॅन करून अवघ्या काही सेकंदांत पेमेंट पूर्ण करता येतं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, सर्व क्यूआर कोड एकसारखे दिसत असले तरी पेमेंट वेगवेगळ्या अकाउंटमध्ये कसं जातं ? उत्सुकता आपल्यालाही असेल ना ?... चला तर मग जाणून घेऊया या मागचे खरे टेक्निक...

डिजिटल इंडियाच्या युगात आता कॅशलेस व्यवहार करणं अनेकजण पसंत करतात. कोणत्याही प्रकारच्या व्यवहारासाठी ऑनलाइन पेमेंट करणं खूप सोपे जाते. फक्त मोबाईलनं क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर पैसे पाठवून काही सेकंदांत व्यवहार पूर्ण केला जातो. पण क्यूआर कोड कसे काम करतो, हे तुम्हाला माहिती आहे का? खरंतर सर्व क्यूआर कोड एकसारखेच दिसतात. मग वेगवेगळ्या अकाउंटमध्ये पैसे कसे जातात? चला तर याबाबत जाणून घेऊ.

क्यूआर एकसारखे दिसत असले तरी प्रत्यक्षात त्यांचा पॅटर्न एकमेकांपेक्षा बराच वेगळा असतो. क्यूआर कोडमध्ये काळे आणि पांढरे पट्टे दिसतात. लांबून पाहिल्यास हे पट्टे सारखेच दिसतात, पण नीट पाहिलं तर एका क्यूआर कोडचं डिझाईन दुसऱ्या क्यूआरपेक्षा पूर्णपणे वेगळं असतं. या दोघांमध्ये बराच फरक असतो. त्याचप्रमाणे लाखो क्यूआर डिझाइन एकमेकांशी तंतोतंत जुळत नाहीत.


क्यूआर कोडवर फक्त काळे व पांढरे पट्टे दिसत असले तरी त्यात एक कोडही दडलेला असतो. क्यूआरमधील कोड थेट तुमच्या बँक अकाउंटशी जोडलेला असतो. त्यामुळे क्यूआर कोडच्या मदतीनं तुम्ही बँक डिटेल्सदेखील जाणून घेऊ शकता. त्याचबरोबर तुमच्या अकाउंट संबंधित माहिती बँकेच्या सर्व्हरमध्ये सेव्ह केली जाते. क्यूआर देताना बँक ही माहिती क्यूआर कोडशी जोडते. त्यामुळे जेव्हा कोणी तुमचा क्यूआर कोड स्कॅन करतो, तेव्हा स्कॅनर तुमचे बँक डिटेल्स शोधतो व संबंधित अकाउंटमध्ये पैसे पाठवता येतात.

ऑनलाइन पेमेंट सिस्टीमद्वारे होणाऱ्या व्यवहारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. हे सर्व केवळ एका क्यूआर कोडद्वारे शक्य आहे. आकडेवारीनुसार, संपूर्ण भारतात 35 करोड पेक्षा जास्त लोक यूपीआय वापरतात. तर, 34 करोड पेक्षा अधिक क्यूआर कोड अ‍ॅक्टिव्ह आहेत. क्यूआर कोडमुळे डिजिटल व्यवहार वाढण्यास मदत झाली आहे. आता तर छोट्या व्यवहारासाठीही अनेकजण क्यूआर कोड स्कॅन करून पैसे पाठवतात. आता लक्षात आले ? क्यू आर कोड सारखेच दिसत असले तरी त्यामधील खरी गमक ?