| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १५ नोव्हेंबर २०२४
अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांच्या प्रचारार्थ सांगली जिल्हा पान असोसिएशनच्या वतीने गुरुवार दि. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी भव्य पद्यात्रा निघाली. आमराई उद्यानापासून सुरू झालेली पदयात्रा पटेल चौक, गणपती पेठ, सराफ कट्टा, कापड पेठ, दत्त मारूती रस्ता, मारुती चौक ते छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आयोजित करण्यात आली होती. या पद्यात्रेत पान दुकानदार, गाळे धारक, खोकीधारक यांनी प्रचंड संख्येने सद्भाग घेतला होता.
स्व. मदन भाऊ पाटील यांनी १८०० खोकीधारकांचे मुव्हेबल व पक्या गाळ्यामध्ये पूर्नवसन केल्यामुळे त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या उपजिविकेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला आहे. स्वर्गीय मदन भाऊंना आदरांजली म्हणून सांगली जिल्हा पान असोसिएशनच्या वतीने या विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांना प्रचंड मताने निवडून देण्याचा निर्धार केला आहे. प्रचारादरम्यान घर टू घर जाऊन सर्वांनी जयश्री मदन पाटील यांच्या 'हिरा' या चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या संख्येने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
यावेळी प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी व जिल्हाध्यक्ष रत्नाकर नांगरे यांनी केला. या पद्यात्रेत तू मयूर बांगर, लालसाहेब तांबोळी, राजू पागे, विजय पाटील, राजू खोत, प्रकाश मोरे, सुरेश जाधव, सूजित शिंदे, मुन्ना शिरोळकर इत्यादी पदाधिकारी व छोटे गाळे धारक, खोकीधारक प्रचंड संख्येने सहभागी होते.