yuva MAharashtra विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध ठिकाणी अत्याधुनिक शासकीय ड्रोनद्वारे करडी नजर !

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध ठिकाणी अत्याधुनिक शासकीय ड्रोनद्वारे करडी नजर !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २० नोव्हेंबर २०२
मा. संदीप भ. घुगे पोलीस अधीक्षक सांगली व रितु खोखर अपर पोलीस अधीक्षक तथा नोडल अधिकारी सांगली यांच्या आदेशान्वये तसेच सुनिल सांळुखे उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग, विपुल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी विटा, सचिन थोरबोले उपविभागीय पोलीस अधिकारी तासगांव व दादासाहेब चुडाप्पा पोलीस उपअधीक्षक (गृह) तथा सहाय्यक नोडल अधिकारी सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ अंतर्गत सांगली जिल्हयामधील एकुण ०८ विधानसभा मतदार संघामध्ये निवडणुक प्रक्रिया सुरु असुन निवडणुकीचे अनुषंगाने लागु असलेल्या आदर्श आचारसंहितेस बाधा येऊ नये तसेच कोणताही अनुचित प्रकार अथवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरीता सांगली जिल्हा पोलीस दल तत्पर व सतर्कतेने कार्य करीत आहे. त्याप्रमाणे जिल्हयामध्ये मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चे अनुषंगाने सांगली जिल्हयामधील एकुण ०८ विधानसभा मतदार संघामध्ये कोणताही गैरप्रकार घडू नये (उदा. मतदार यांना पैसे वाटप करणे तसेच कोणत्याही आक्षेपार्ह वस्तूचे वाटप करणे, प्रलोभणे दाखविणे, गुन्हेगारी कृत्यांना वेळीच आळा घालणे, संवेदनशिल भागातील हालचाली, घडामोडी वेळीच लक्षात येण्याकरीता खबरदारी म्हणून सातत्याने विविध ठिकाणी सांगली जिल्हा पोलीस दलाकडील शासकीय ड्रोन कॅमेऱ्याव्दारे करडीनजर ठेवण्यात येत आहे. सदर ड्रोन कॅमेऱ्याची चित्रीकरणाची क्षमता हि किमान ०३ कि.मी अंतरापर्यंतची आहे. त्यामुळे जवळजवळ संपूर्ण शहरावरती ड्रोन कॅमेऱ्याची नजर राहणार आहे.

त्यानुसार आज दि. १९/११/२०२४ रोजी २८७-तासगांव-कवठेमहांकाळ मतदार संघातील कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, ग्रामीण रुग्णालय कवठेमहांकाळ, २८८- जत मतदार संघातील जत शहरामध्ये पारधी वस्ती, हनुमान मंदीर परिसर, जत एस टी स्टॅन्ड परिसर, २८६- विटा-खानापूर मतदार संघातील विटा शहरामध्ये शिवाजी चौक, खानापूर नाका तसेच २८५- कडेगांव-पलुस मतदार संघातील पलुस शहरामध्ये बौध्दनगर वसाहत, मांतग वसाहत, पलुस एस टी स्टॅन्ड परिसर या ठिकाणी शासकीय ड्रोन कॅमेऱ्याव्दारे करडी नजर ठेवण्यात आली आहे. तसेच सदर वेळी संबधीत पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी व पोलीस उपनिरीक्षक पठाण सायबर पोलीस ठाणे, पोहेकॉ/१०८ मुजावर जिल्हा विशेष शाखा, सांगली, पाहेकॉ/१८६९ शिंदे नेम पो मुख्या सांगली व इतर स्टाफ असे हजर होते.