yuva MAharashtra पृथ्वीराजबाबांनी सांगलीचं हित केलं.. मी त्यांच्या पाठीशी सांगलीत काँग्रेसचा हातच विजयी होईल - विश्वजीत कदम

पृथ्वीराजबाबांनी सांगलीचं हित केलं.. मी त्यांच्या पाठीशी सांगलीत काँग्रेसचा हातच विजयी होईल - विश्वजीत कदम


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ नोव्हेंबर २०२
नांद्रे गाव काँग्रेस विचारधारा मानणारा गाव आहे. वसंतदादा पाटील गुलाबराव पाटील, पतंगराव कदम, शिवाजीराव देशमुख यांनी काँग्रेसला ताकद दिली. पृथ्वीराजबाबांनी दहा वर्षे काँग्रेसचा झेंडा हाती घेऊन एकनिष्ठ पणे सांगलीकरांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन कामं केली आहेत. त्यांनी अनेक प्रश्न सोडवले आहेत. मी मंत्री असताना ते सांगलीची कामं घेऊन यायचे. गुलाबरावांचा वैचारिक कार्य वारसा ते नेटाने चालवून शैक्षणिक व सामाजिक कार्य करीत आहेत. असे कौतुकोद्गार आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी काढले. ते नांद्रे येथे महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.

यावेळी बोलताना पुढे ते म्हणाले की, सांगलीच्या आमदारांनी दहा वर्षांत विधानसभेत तोंड उघडले नाही. महापालिकेत जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवला नाही. पूरग्रस्तांसाठी मदत मागितली नाही. पृथ्वीराजबाबा पाटील यांनी मात्र महापालिका व स्थानिक प्रशासनासमोर जनतेचे प्रश्न मांडून न्याय मिळवून देण्यासाठी धडपडतात. सांगलीत काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचाच विजय झाला पाहिजे. मला सांगली जिल्ह्य़ात काँग्रेस मजबूत करायची आहे. असे आवाहन. डॉ. विश्वजीत कदम म्हणाले. 

जिल्ह्यात महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील यासाठी मी व जयंतराव एकत्र काम करत आहोत. पृथ्वीराजबाबा हे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. नांद्रे गावाने गेल्या विधानसभेत पृथ्वीराजना लिड दिलं आहे. मी पृथ्वीराज पाटील यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे. याहीवेळी त्यांना लिड देऊन त्यांच्या हात चिन्हासमोरील बटण दाबून त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी केले. 


ते पुढे म्हणाले की, 'भाजपाचे महायुती सरकारने आरक्षणाचा घोळ घातला, महागाई प्रचंड वाढली आहे. बेरोजगारी वाढली आहे. लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले. दिलेले पैसे महागाई व स्टँपचे दर वाढवून वसूल केले. शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेला मतदान करुन महाविकास आघाडी विजयी करा. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे.

यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले, 'नांद्रे गाव काँग्रेसलाच भरघोस मतदान करते. बाबासाहेबांना मानणारे कार्यकर्ते हे मलाच मतदान करतील. शरीराने आज उपस्थित नसणारे मनाने काँग्रेस बरोबर आहेत. असे सांगून पुढे ते म्हणाले की, आमदार गाडगीळ यांनी काय काय शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत. ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी ते अपयशी ठरले आहेत. महिलांच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष नाही. शेती परवडत नाही. खताचे दर वाढले. मला निवडून दिल्यास मी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेत आवाज उठवणार आहे.ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कर्मवीर नगरातील मालमत्ता गावकऱ्यांच्या नावावर होण्यासाठी मी काम केले. असे पृथ्वीराज पाटील यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले की, माझे नेते आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करताना त्यांनी सांगलीकरांच्या कामात मला नेहमीच मदत केली आहे आहे. निधी आणला. विकास कामे केली. अपक्षांना मत म्हणजे थेट भाजपाला मत दिल्यासारखे आहे. नांद्रेकर कायम काँग्रेस पक्षाला मतदान करताना. आमदार नसताना मी अनेक कामे केली. आता मला गेल्यावेळी थोडक्यात हुकलेली संधी द्या. सांगलीचा आमदार कसा असतो हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. माझ्या हात चिन्हासमोरील बटण दाबून मला भरघोस मतांनी निवडून द्या.'

यावेळी सच्चिदानंद कदम व सचिन जगदाळे यांनी पृथ्वीराज पाटील यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन महावीर पाटील यांनी केले. 

या प्रचार सभेत मधुकर पाटील, सुदर्शन हेरले, जयकुमार कोले, आयुब कागदी, अय्याज नायकवडी, मंगेश चव्हाण, मयूर पाटील, सचिन सकळे, अशोक सकळे, विकास मोहिते, विकास बोंद्रे, सिध्दार्थ माने, अशोकसिंग रजपूत, मौला वंटमुरे, सरदार मुल्ला, प्रमोद सुर्यवंशी, डॉ. नामदेव कस्तुरे व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नांद्रे ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.