yuva MAharashtra छत्रपती शिवाजी महाराज मंडई हायटेक करणार आ. सुधीरदादा गाडगीळ यांचे आश्वासन !

छत्रपती शिवाजी महाराज मंडई हायटेक करणार आ. सुधीरदादा गाडगीळ यांचे आश्वासन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १२ नोव्हेंबर २०२
माजी आमदार (कै.) संभाजी पवार (आप्पा) यांच्यामुळे मी राजकारणात आलो. भारतीय जनता पक्षाचा शहर जिल्हाध्यक्ष म्हणून माझी निवड अप्पानीच केली होती. त्यांच्याच कार्याचा आदर्श समोर ठेवून भाजी विक्रेते, फळ विक्रेते आणि फेरीवाले यांना बरोबर घेऊनच मी सांगलीच्या विकासासाठी काम करीत आहे. त्यामुळे भाजी मंडई अधिकाधिक चांगली करणार आहे. शहरातील भाजीविक्रेते फळ विक्रेते, फास्टफुडवाले, फेरीवाले यांना जास्तीत जास्त सुविधा कशा मिळतील याकडे मी लक्ष देणार आहे, असे अश्वासन सुधीरदादा गाडगीळ यांनी दिले. 

भाजी मंडई येथील भाजी आणि फळ विक्रेते, हातगाडीवाले, फेरीवाले, फास्टपुड विक्रेते यांनी आमदार गाडगीळ यांच्यासाठी प्रचार सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी सुधीरदादा गाडगीळ बोलत होते. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार या सभेचे संयोजक होते. माजी आमदार नितीन शिंदे उपस्थित होते,

सुधीरदादा गाडगीळ यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत, घोषणांच्या जल्लोषात आणि लेझीम व हलगीच्या निनादात स्वागत करण्यात आले. 


यावेळी बोलताना पृथ्वीराज पवार म्हणाले, आप्पा ज्याप्रमाणे भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फेरीवाले यांच्यासाठी आप्पा ज्याप्रमाणे काम करीत होते, तसेच काम सुधीरदादा गाडगीळ हे करीत आहेत.

मतदार संघाचा सर्वांगीण विकास करणारे आणि गोरगरिबांची कामे आस्थेने करणारे आमदार म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे. गोरगरीब, झोपडपट्टीवासीय, रस्त्यावरचे विक्रेते यांना मदत करण्यासाठी दादा नेहमीच पुढे असतात. त्यामुळे त्यांना आपण पुन्हा एकदा भरघोस मताधिक्याने विजयी करायचे आहे, असे आवाहन यावेळी पृथ्वीराज पवार यांनी केले. पवार म्हणाले, काँग्रेसने गरीबी हटाव अशा फक्त घोषणा केल्या, पण भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सरकार यांनी खऱ्या अर्थाने गरिबी हटवण्याचे काम केले आहे.

यावेळी स्मिता पवार, विजय साळुंखे, भाजी विक्रेते व फेरीवाले संघटनेचे अध्यक्ष श्याम हिंदुराव कोकरे, मीना विष्णू चौगुले, आशा कोकरे, प्रकाश माळी, गजू नांदरेकर, राहुल कोकरे, सचिन वाकसे, राधिका सप्रोजी, जयश्री भोसले, सविता कटरे, अजित राजोचा, लता कांबळे, अनिल येडकर, अनिल सय्यद, फारुखभाई खलिभाई, शबीरा मुल्ला तसेच फेरीवाले, भाजी विक्रेते, हातगाडीवाले, फळ विक्रेते व फास्टफुड विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.