yuva MAharashtra राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या पाठीशी ठाम - संगिता हारगे

राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या पाठीशी ठाम - संगिता हारगे


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १२ नोव्हेंबर २०२
महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात सदर बैठक पार पडली. यावेळी महिला शहर जिल्हाध्यक्षा संगिता हारगे म्हणाल्या की , राष्ट्रवादी महिला आघाडीच्या सर्व महिला पदाधिकारी यांनी सांगली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज (बाबा) पाटील व मिरज मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार तानाजी सातपुते यांच्या प्रचारामध्ये सर्व महिला पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग घेतला असून प्रभाग निहाय प्रत्येक भागात प्रचार करत आहेत , महाविकास आघाडीच्या सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघाच्या दोन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार आम्ही सर्व महिला पदाधिकारी यांनी केला आहे ,


काल पक्षातील काही महिला पदाधिकारी यांनी सांगली मतदार संघाच्या अपक्ष उमेदवार श्रीमती जयश्री पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्याचे समजले, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असून पक्षाशी याचा काही संबंध नाही, त्यांनी घेतलेल्या सदर भूमिकेबाबत पक्षातील वरिष्ठांना कळवले असून ते लवकरच त्यावर आपला निर्णय कळवतील असे ही त्या म्हणाल्या .

यावेळी महिला शहरजिल्हाध्यक्षा संगिता हारगे, सांगली शहराध्यक्षा वैशाली धुमाळ, कुपवाड शहराध्यक्षा प्रियांका विचारे, कार्याध्यक्षा संगिता जाधव अनिता पांगम, छाया पांढरे, अश्विनी देशपांडे, पूजा आवळे, फिरोजा जमादार, उज्वला निकम, परवीन फकीर आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.