| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - दि. ६ नोव्हेंबर २०२४
'लाडकी बहीण' साठी आता - २१०० रूपये देणार असून याचे वचन देतो असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महायुतीच्या प्रचाराचा श्रीगणेशा करवीर नगरीतून झाला. यावेळी ते बोलत होते. 'कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील. २३ तारखेला विजयाचा गुलाल उधळण्यासाठी येथे येणार आहोत.' असाही विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा महाराष्ट्रातील प्रचाराचा प्रारंभ करवीरनगरीतून झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचे दहाही उमेदवारांनी मंगळवारी सायंकाळी अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर कसबा बावडा रोडवरील मेरी वेदर मैदानावर महायुतीच्या महाराष्ट्रातील प्रचाराचा प्रारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
लाडक्या बहिणींच्या अशिर्वादामुळे ही योजना सुपरहिट झाली. त्यामुळे विरोधकांच्या पोटशुळ उठला आहे, काही सावत्र भाऊ ही योजना बंद पडावी म्हणून कोर्टात गेले आहेत. पण हा एकनाथ शिंदे जेलमध्ये जाईल, पण ही योजना कधीही बंद पडू देणार नाही, असा निर्धारही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
जाहीरनाम्यातील १० कलमांची घोषणा :
१) लाडक्या बहिणींना १५०० वरून २१०० रुपये, २५ हजार महिलांना पोलीस दलात समावेश..
२) शेतकऱ्यांना कर्ज माफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षला १५००० रुपये, MSP वर २० टक्के अनुदान.
३) प्रत्येकास अन्न वस्त्र आणि निवारा.
४) वृद्ध पेन्शनधारकांना 2100 रुपये.
५) जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणार.
६) 25 लाख रोजगार निर्मिती तसेच दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये देणार.
७) ४५ हजार गावात पाणंद रस्ते बांधणार.
८) अंगणवाडी आणि आशा सेविकांना पंधरा हजार आणि सुरक्षा कवच देणार.
९) वीज बिल ३० टक्के कपात करून सौर आणि अक्षय उरलीवर भर देणार.
१०) सरकार स्थापनेनंतर भजन महाराष्ट्र 329 शंभर दिवसांच्या आत सादर करणार.