yuva MAharashtra कर्नाळमध्ये लाडक्या बहिणींच्या मेळाव्यात सुधीरदादांना प्रचंड बहुमत देण्याचा दिला शब्द !

कर्नाळमध्ये लाडक्या बहिणींच्या मेळाव्यात सुधीरदादांना प्रचंड बहुमत देण्याचा दिला शब्द !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ नोव्हेंबर २०२
कर्नाळ येथे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या उपस्थितीत भाऊबीजेदिवशी लाडक्या बहिणींचा मेळावा प्रचंड उत्साहात संपन्न झाला. उपस्थित भगिनींनी सुधीरदादांचे पंचारतीने ओवाळून औक्षण केले आणि त्यांना 'विजयी व्हा 'अशा शुभेच्छा दिल्या.

गावातील मगदूमनगरमधील रहिवाशांनीच लाडकी बहीण मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला सुधीरदादांना निमंत्रित करण्यात आले होते. मेळावास्थळी त्यांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतशबाजीत आणि घोषणांच्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पुष्पगुच्छ देऊन दादांचे स्वागत केले.

श्रीकृष्ण मोहिते यांनी सांगितले की, येथे राहणारा समाज हा हातावर पोट असणारा मजुरी करणारा समाज आहे. महायुती शासनाच्या लाडकी बहिण योजनेमुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुधीरदादा यांनी येथे रस्त्यांची कामे करून आम्हाला खूप मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून सुधीरदादांना तिसऱ्यांदा आमदार करायचे आहे.


ग्रामस्थांनीच सांगितले की, महाराष्ट्रात सुरू केलेली लाडकी बहीण ही योजना यापुढेही सुरू ठेवायची असेल तर सुधीरदादा यांना तसेच महायुती सरकारला प्रचंड बहुमताने निवडून देणे आवश्यक आहे. विरोधक सत्तेवर येण्यापूर्वीच योजना बंद करायची भाषा करीत आहेत. त्यामुळे लोकांनी सावध राहावे.

सुधीरदादा यांना भेटायला विरोधी पक्षातील काही मंडळी गेली होती. मात्र दादांनी कोणताही गट तट किंवा पक्षीय भेद न करता त्यांचे काम तातडीने केले. असा अजातशत्रू लोकप्रतिनिधी आपल्याला लाभला आहे त्यामुळे त्यांना बळ देणे हे आपले कर्तव्य आहे, असेही उद्वार एका ग्रामस्थाने काढले.

मगदूमनगर येथील ७० टक्के घरे पंतप्रधान आवास योजनेतून पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आपण चांगले विचार आणि चांगले काम करणारी माणसेच निवडून दिली पाहिजेत असेही काही रहिवाशांनी सांगितले. दिलीप अवताडे म्हणाले, सुधीरदादा हे शुद्ध सोन्याचे खणखणीत नाणे आहे. त्यामुळे काय निवडायचे ते तुम्ही ठरवायचे आहे.

एका ज्येष्ठ नागरिकाने दादांची आणखी एक आठवण सांगितली. ते म्हणाले, मी सुधीरदादांना एका कामानिमित्त ऑफिसमध्ये भेटायला गेलो होतो. तेव्हा दादांचा वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू होता. तो कार्यक्रम सुरू असतानाही त्यांनी माझी आस्थेने चौकशी केली आणि माझे काम केले. दादा हे जनसामान्यांचे नेते आहेत. जात, धर्म, पंथ, पक्ष न पाहता ते कामाला महत्त्व देतात. अशा निष्कलंक, निस्वार्थी नेत्याला तिसऱ्यांदा भरघोस मतांनी निवडून द्यायची संधी आपल्याला आली आहे मिळाली आहे.

सुधीरदादा म्हणाले, आजपर्यंत गाडगीळ कर्नाळ गावासाठी सुमारे रु. ५१ कोटी इतका निधी आणण्यात आपण यशस्वी झालो आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत. या गावात मला नेहमीच आपुलकीचा आणि अस्थेवाईक असा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या गावासाठी अजून खूप काम करायचे नियोजन आहे.

काही महिलांनी सांगितले की अजून एक रस्ता आम्हाला येथे करून हवा आहे. तेव्हा त्यांना सांगितले की निवडणुकीनंतर दुसऱ्या दिवशी तुमचे काम मी शंभर टक्के करीन. दादांच्या या अभिवचनावर उपस्थित महिलांनी टाळ्यांचा कडकडाट करून प्रतिसाद दिला.

यावेळी ओबीसी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रदीप कांबळे, तुषार पाटील, केशव पाटील, गणेश टोणे, सचिन टोणे, नागेश रानगट्टे, बसाप्पा रानगट्टे, संजय खोत, समाधान खोत, श्रीधर रानगट्टे, रोहित जाधव, विकास पाटील, गोपाळ टोणे, संतोष कारंडे, दीपक कारंडे, रामगोंडा नरळे, प्रशांत मगदूम, संतोष टोणे, शामराव घेरडे, अमोल खांडेकर, संतोष करांडे, राहुल जाधव, म्हाळाप्पा टोणे, चंद्रकांत करांडे, अमोल खांडेकर, राजेश टोणे, आदित्य रानगट्टे, सुनील खेरडकर, नानासो करंडे तसेच कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.