yuva MAharashtra आक्षेपार्ह मजकूरप्रकरणी माधवनगर येथील वॉटस् ॲप अ‍ॅडमीनवर गुन्हा दाखल ! ग्रुप ॲडमिन्सने काळजी घेण्याचा गरज !

आक्षेपार्ह मजकूरप्रकरणी माधवनगर येथील वॉटस् ॲप अ‍ॅडमीनवर गुन्हा दाखल ! ग्रुप ॲडमिन्सने काळजी घेण्याचा गरज !


| सांगली समाचार वृत्त |
माधवनगर - दि. १७ नोव्हेंबर २०२
माधवनगर (ता. मिरज) येथील एका सोशल मीडिया ग्रुपवर दोन समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर टाकण्यात आला. याबाबत संजयनगर पोलिसांत तक्रार दाखल झाली असून वॉटस् ग्रुप अ‍ॅडमीनवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. राजेश सीताराम आवटी (रा. माधवनगर) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत सनोबर दाऊद खान (वय 46, रा. माधवनगर) यांनी संजयनगर पोलिसांत फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आपलं माधवनगर या नावाचा व्हॉट्स अप ग्रुप असून त्याचा अ‍ॅडमीन राजेश आवटी होता. त्याने 15 रोजी रात्री त्याच्याऐवजी दुसर्‍यालाच अ‍ॅडमीन केले. 14 रोजी रात्री त्याने हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर व्हॉट्स अपवर शेअर केला. फिर्यादीने आवटी याच्याशी संपर्क केला. पण त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. गावातील इतर ग्रुप सदस्यांशी संपर्क करून आक्षेपार्ह मजकुराबाबत माहिती दिली. त्यानंतर संजयनगर पोलिसांत राजेश आवटी याच्याविरोधात तक्रार दाखल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यानुसार पोलिसांनी आवटीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


सध्या निवडणुकीचे वातावरण असून विविध व्हाट्सअप ग्रुप वर जातीवाचक आणि विविध पक्षांच्या नेते, कार्यकर्ते यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होत आहेत. यामुळे समाजात आणि गटागटामध्ये तणावाचे व वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. सध्या पोलीस खात्याचा सायबर विभाग सर्व व्हाट्सअप ग्रुप वर लक्ष ठेवून असून, समाजात व जाती जातीत तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल करणाऱ्या ग्रुप ॲडमिन आणि संबंधितावर गुन्हे दाखल करीत असून. सर्व ग्रुप ॲडमिन्सने याबाबत खबरदारी घेण्याची गरज आहे, असे निवेदन पोलीस खात्याकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.