| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १५ नोव्हेंबर २०२४
पद्मभूषण स्व. डॉ. वसंतरावदादा पाटील यांची जयंतीनिमीत्त वसंतदादा समाधीस्थळी, त्याचबरोबर वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना स्थळी, पी.व्ही.पी.आय. टी कॉलेज बुधगाव, जिल्हा काँग्रेस कमिटी सांगली येथे अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिकदादा पाटील, सांगली लोकसभा खासदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कमिटीचे उपाध्यक्ष खा. विशालदादा पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा, श्रीमती शैलजाभाभी पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा तथा सांगली विधानसभेच्या अपक्ष उमेदवार श्रीमती जयश्रीवहिनी पाटील यांचे हस्ते स्व. वसंतदादा पाटील यांच्या समाधीस पुष्पचक्र अर्पण करणेत आले. तसेच सर्व उपस्थितांनी फुले वाहून आदरांजली वाहिली.
यावेळी सर्वधर्मीय प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. यावेळी विश्वासबापू पाटील सौ. पुजा वहिनी पाटील, हर्षवर्धन पाटील, सत्यजीत होळकर पाटील, डॉ. जितेश कदम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कमिटीचे उपाध्यक्ष प्रा. मोहन व्हनखंडे सर, मिरज विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते, दिगंबर जाधव, प्रा. डॉ. सिकंदर जमादार, डॉ. ऋतुजा चोपडे, उत्तम पवार, सर्जेराव पवार, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती सुरेश शिंदे, संचालक शशिकांत नागे, जि.प. सदस्य विशाल चौगुले, नगरसेवक उत्तम साखळकर, संतोष पाटील, प्रकाश मुळके, नगरसेविका सौ. रोहिणी पाटील, सी. शुभांगी साळुंखे, माजी महापौर किशोर शहा, माजी नगरसेवक राजेश नाईक, जिल्हा काँग्रेस कमिटीचे खजिनदार पी. एल. रजपूत सर, सांगली बसंतदादा शेतकरी साखर कारखाना व्हा. चेअरमन सुनिल आवटी, संचालक सुरेश पाटील, संभाजी मेंढे, माजी संचालक सुरेश पाटील बागणी वसंतदादा दुध संघाचे अध्यक्ष अशोकराव पाटील, विष्णुअण्णा खरेदी विक्री संघ चेअरमन संग्राम पाटील, उदय पवार, आदिनाथ मगदूम, रघुनाथबापू पाटील, सचिन डांगे, शमाकांत आवटी, प्रदिप पाटील शेतकरी संघटना, ऍडव्होकेट भाऊसाहेब पवार, धनाजी पाटील कोकळे, सुरेश निकम, रमेश ताटे, महावीर कागबाडे जिल्हा काँग्रेस सेवादलचे अध्यक्ष अजित ढोले, प्रदीप शिंदे, श्रीकांत पाटील, राजेश एडके, प्रदीप मगदूम, संतोष वंजाळे, संदीप आडमुठे, अनुप पाटील, गजानन मिरजे, राजेंद्रप्रसाद जगदाळे, सुनिल गुळवणे, उदय बरगाले, अमोल भिसे, बाहुबली कबाडगे, गजानन साळुंखे, महेश साळुंखे, लालसाब तांबोळी, संभाजी पाटील बेडग, प्रमोद इनामदार, प्रदीप सावंत, गंगाधर तोडकर, डॉ. उस्मान मुजावर, श्रीमंत पांढरे, मकरंद चिखले, महेश चिखले प्रविण साळुंखे, अल्ताफ खान, प्रकाश कांबळे, भानुदास खांडेकर, उल्हास पाटील शिरोळ सर्व उपस्थितांनी फुले बाहून आदरांजली वाहिली.
वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना स्थळी वसंतदादा शेतकरी साखर व्हा. चेअरमन सुनिल आवटी, एम. डी. संजय पाटील, संचालक सुरेश पाटील, माजी संचालक सुरेश पाटील, हेमंत कुरणे, ॲड. व्ही. एम. कुंभार, खाडीलकर, नारायण जाधव यांनी आदरांजली वाहिली. वसंतदादा अभियांत्रिकी महाविद्यालय बुधगाव येथे पी. एल. रजपूत सर, आदिनाथ मगदूम, प्रा. बी. एस. पाटील सर, रजिस्टार संदीप उमराणी, राजाराम पाटील आणि कर्मचारी वृंद, विद्यार्थी यांनी कॉलेज येथे आदरांजली वाहिली.
त्याचबरोबर सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी येथेही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सहकार महर्षीं लोकनेते पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांची जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कमिटीचे उपाध्यक्ष प्रा. मोहन व्हनखंडे सर, सांगली जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष आण्णासाहेब खोत, महावीर कागवाडे, जिल्हा काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष अजित ढोले, पैगंबर शेख, मौला बेटमोरे, अरुण पळसुले, पंडीत पवार, संजय कुलकर्णी, भिमराव चौगुले, शिवराज पाटील, गजानन भगत, शिवाजी माळी, अमोल पाटील, श्रीनाथ देवकर, श्रीमंत पांढरे, वसंत सुतार, शैलेंद्र पिराळे, विठ्ठल काळे, बाबगोंड पाटील, प्रमोद आवळे, अनिल मोहिते, सुरेश गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.