yuva MAharashtra सांगली जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत तिरंगी आणि अटीतटीची लढत होणार !

सांगली जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत तिरंगी आणि अटीतटीची लढत होणार !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १९ नोव्हेंबर २०२
राजकीय घडामोडीचे केंद्र म्हणून सांगली जिल्हा परिचित आहे. या जिल्ह्यात बहुतांश करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक मंत्री, मुख्यमंत्री झाले आहेत. दिवंगत वसंतदादा पाटील, दिवंगत आर्.आर्. पाटील, दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांपासून, जयंत पाटील, विश्वजित कदम, सुरेश खाडे, रोहित पाटील अशा नेत्यांपर्यंत सांगली जिल्ह्यात बड्या नेत्यांची फौज आहे. सांगली जिल्ह्यात विधानसभेचे ८ मतदारसंघ आहेत, तर १ लोकसभा मतदारसंघ आहे. लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये येथे अपक्ष विशाल पाटील विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यात लढत झाली. यामध्ये विशाल पाटील यांनी बाजी मारली. वर्ष २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला ३, काँग्रेस २, भाजप २, शिवसेनेला १ जागा मिळाली होती. यंदा सांगली जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदारसंघात तिरंगी आणि अटीतटीची लढत होणार आहे. सांगली येथे वर्ष २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


सांगली जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदारसंघांतील प्रमुख लढती अशा होणार…

१. सांगली विधानसभा - सुधीर गाडगीळ (भाजप), पृथ्वीराज पाटील (काँग्रेस), श्रीमती जयश्रीताई पाटील (अपक्ष)

२. मिरज विधानसभा - सुरेश खाडे (भाजप), तानाजी सातपुते (शिवसेना ठाकरे गट), विज्ञान माने (वंचित)

३. तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा - संजयकाका पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट), रोहित पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गट)

४. खानापूर विधानसभा - सुहास बाबर (शिवसेना-शिंदे), वैभव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट), राजेंद्र अण्णा देशमुख (अपक्ष) ५. पलूस कडेगाव विधानसभा - डॉ. विश्वजित कदम (काँग्रेस), संग्रामसिंह देशमुख (भाजप)

५. शिराळा विधानसभा - मानसिंगराव नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट), सत्यजित देशमुख (भाजप)

६. इस्लामपूर विधानसभा - जयंत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट), निशिकांत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)

७. जत विधानसभा - विक्रम सावंत (काँग्रेस), गोपीचंद पडळकर (भाजप), तमनगौडा रवी पाटील (अपक्ष)