| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १५ नोव्हेंबर २०२४
संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडत आहे. ह्या निवडणूकीमध्ये सांगली जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उभे आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणूकीसाठी सांगली जिल्ह्यातील संपूर्ण मातंग समाजाच्या वतीने महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठींबा देत आहोत.
मोदी शहाच्या भाजपाने आणि आरएसएसने संविधान बदलण्याची भूमिका घेतलेली आहे. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या, आणि तुमच्या आमच्या, मराठी- महाराष्ट्राचा स्वाभिमान, अस्मिता पायदळी तुडविण्याचे काम सातत्याने भाजपा महायुतीने केलेलं आहे. त्याचबरोबर, अनेक संत आणि महापुरुष यांची प्रतिमा फक्त मलिन नव्हे तर विकृत करण्याचा कुटील डाव राजकारणाच्या आडून केला जातो आहे. ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध, हिंदू यांच्यामध्ये जातीय, धर्मीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे भारतीय संविधान आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता, लोकशाही टिकविण्याची जबाबदारी मातंग समाजाची आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवतावादी संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी मातंग समाजाची आहे. म्हणून आम्ही महायुतीच्या बाजूने नाही. त्यांना आमचा विरोधच असेल.
महाविकास आघाडीने आम्हाला आश्वासित केलेले आहे की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर जातीनिहाय जनगणना पुर्ण केली जाईल. त्याचबरोबर, लोकसंख्येनुसार आरक्षणाची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात येईल. "शिव,फुले, शाहू, बाबासाहेब, अण्णाभाऊ, लहुजीबाबा" यांच्या मानवतावादी, समतावादी विचाराने महाविकास आघाडी काम करेल.
1 ) सांगली जिल्ह्यातील पंचायत राज व्यवस्थेमध्ये (नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद) मातंग समाजाच्या चळवळीत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याना प्रामुख्याने संधी देणे. शासन -प्रशासकीय समितीवर नियुक्ती करणे.
2 ) सांगली शहरातील पुष्कराज चौकातील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास अधिकृत मान्यता देणे. त्याचे सुशोभीकरण करणे.
3 ) सांगली हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने शहरात अण्णाभाऊंच्या कार्यकर्तृत्वाला आणि नाव लौकिकाला शोभेल असे सर्व सोयीनीं युक्त,भव्य स्मारक उभा करणे.
4 ) सांगलीच्या ग्रामीण भागातील मातंग समाजामध्ये सुसज्ज ग्रंथालय आणि अभ्यासिका स्थापन करणेसाठी योग्य तो निधी उपलब्ध करून देणे.
5 ) मातंग समाजाच्या शहरी ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणे.
या प्रमुख मागण्यास महाविकास आघाडीने सहमती दर्शविली आहे. आणि म्हणून आम्ही महाविकास आघाडीस जाहीर पाठींबा देत आहोत.
सांगली विधानसभा मतदारसंघांचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार, गेली दहा वर्ष अखंडपणे सर्वांसामान्य माणसांची जिद्दीने, धाडसाने कार्यरत राहून मनं जिंकणारे आणि खऱ्या अर्थाने "सांगलीचा आवाज" म्हणून असलेले मा. पृथ्वीराज बाबा पाटील यांना किमान 25 हजाराचे मताधिक्य मिळवून देण्यासाठी मातंग समाज जीवाची बाजी लावेल.
त्याचबरोबर, सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी निवडून आणण्यासाठी मातंग बंधू भगिनींनी ताकदीने प्रचारात सहभागी व्हावे. असे आवाहन मातंग समाज सांगली जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे.
यावेळी प्रा. सुकुमार कांबळे सर, प्रा. राम कांबळे, शिवसेना उबाठाचे जिल्हा उपप्रमुख शंभूराज काटकर, प्रा. लक्ष्मण मोरे, डॉ. नामदेव कस्तुरे, आकाश तिवडे (मेजर), ,सचिन केंचे हरिपूर, संतोष सदामते, विक्रम मोहिते नांद्रे, तानाजी आवळे बुधगाव, इसाक घाडगे माधवनगर, राहुल साठे कर्नाळ, अतुल आवळे सांगलीवाडी, करण बिरणे धामणी, सुनील देवकुळे, माधवनगर, इसाक घाडगे माधवनगर, वैभव सपकाळ चिंतामणीनगर, महेश सकटे इंदिरानगर, सुनील आवळे बुधगाव, नेताजी आवळे बुधगाव, श्रीकांत साठे संजयनगर, अर्जुन कांबळे, ग्याबरील तिवडे, अशोक वायदंडे, सतीश लोंढे, ज्ञानेश्वर केंगार, राहुल वायदंडे शांतीनगर, सावंता माने, लीना यादव, उदय भोसले, निलेश मोहिते, दादासाहेब कस्तुरे, कपिल मगदुम, सूर्यकांत लोंढे, मंगेश वाघमारे, आदर्श मोरे, हर्षल मोरे, अवधूत सदामते, विनोद आवळे, विशाल मोरे, महेश सकटे, संजय लोखंडे, जितेंद्र हेगडे यांच्यासह मोठ्या संख्येने मातंग समाज बांधव उपस्थित होते.