| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ सप्टेंबर २०२४
पाच हजार रुपयांचे मासिक पगार वाढ आणि एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यभरातील लाखो एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता, याचा फटका राज्यातील विविध आजारांना मोठ्या प्रमाणावर बसला. यामध्ये सांगली आगाराला सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे.
दोन दिवस झालेल्या या संपात राहून अधिक कर्मचाऱ्यांपैकी 1,511 कर्मचारी संपावर गेले होते त्यामुळे सांगली जिल्ह्यात असलेल्या पाच आगारांचे काम पूर्णपणे तर पाच आगारांचे कामावर अंशतः परिणाम झाला होता. जवळपास 3000 बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या होत्या यामुळे महामंडळाचा दररोज 75 लाख रुपयांचा महसूल बुडाला आहे. या संपामध्ये मिरज, जत, आटपाडी, तासगाव आणि पलूस आगारातून एकही बस सोडली गेली नाही. तर उर्वरित सांगली, इस्लामपूर, सांगली, इस्लामपूर विटा आणि शिराळा या आगाराच्या कामकाजावर 50 टक्क्याहून अधिक परिणाम दिसून आला.
मुंबई प्रमाणेच सांगली आगारातूनही कोकणात जाण्यासाठी 235 बस गाड्यांचे बुकिंग झाले होते, ज्यामधून शेकडो कोकण कोकणवासी आपल्या गावी गणेशोत्सवासाठी जाणार होते. यापैकी काहींनी बसेस बंद असल्यामुळे अन्य पर्याय शोधला तर काहींना सात सप्टेंबर पासून बस सेवेचा लाभ होणार आहे. यामुळे सर्वच बस प्रवाशातून झालेल्या गैरसोयीमुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.