| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १९ सप्टेंबर २०२४
महापालिकेने सांगली,मिरज कुपवाड, शहरासाठी श्री गणेशाच्या विसर्जनासाठी कृष्णा घाट, सांगली, श्रीशूल, विष्णू, स्वामी समर्थ घाट , मिरज कृष्णा घाट, गणेश तलाव मिरज येथे प्रशासकीय देखरेखी खाली मनपाने सोय केली होती, तसेच कृत्रिम कुंड, आणि मूर्तीदान केंद्रे, आणि निर्माल्य जमा करण्यासाठीची व्यवस्था देखील चांगली करण्यात आली होती.
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात अनंत चतुर्दशी पर्यंत ६३१२८ श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
अनंत चतुर्दशीच्या अखेर विसर्जनाच्या दिवशी नैसर्गिक विसर्जन (नदी ,तलाव, विहीर) ४६०४४ आणि कृत्रिम विसर्जन कुंडात (जलकुड, शेत तळे) १७०८४ आणि एकूण १४९० श्री. गणेश मुर्त्या महापालिकेकडे दान करण्यात आले आहेत. तर १०६.९ टन निर्माल्य संकलित झाले आहे.
मा.आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका प्रशासनाने सांगली, मिरजेच्या कृष्णा नदी घाटावर तसेच विविध ठिकाणी नियोजित केलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडाच्या आवारात सर्व व्यवस्था करण्यात आली होती. अति आयुक्त रविकांत अडसूळ यांनी या वेळी सर्व नियोजन केले होते, उप आयुक्त संजीव ओहोळ ,सहा आयुक्त सहदेव कावडे , अनिस मुल्ला शहर अभियंता श्री चव्हाण आणि त्यांची टीम , विधुत अभियंता अमरसिह चव्हाण यांनी त्यांची टीम आणि अतिक्रमण टीम इत्यादी मनपा कर्मचारी अधिकारी यांनी चागले काम केले आहे,
मिरज आणि सांगली श्री गणेश विसर्जन या ठिकाणी असलेली सर्व व्यवस्था मा आयुक्त शुभम गुप्ता यांनी समक्ष उपस्थितीत राहून पाहणी अंती सबधितांना सूचना दिल्या होत्या. सांगली, मिरज कुपवाड मधून निघणाऱ्या सर्व मंडळाच्या गणपतीचे मिरवणुकीपासून ते विसर्जनापर्यंत प्रशासनाच्या देखरेखीखाली पार पडले आहे. मिरज मध्ये उशिरा पर्यत श्री गणेश विसर्जन करण्यात आले आहे, या वेळी विशेष बाब म्हणून ५० कॅमेरे आणि गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची सोय पोलीस व प्रशासनास उपलब्ध करून दिली होती.
नदी घाटावर आपत्कालीन व्यवस्था म्हणून महापालिका अग्निशमन दलाच्या यंत्रणा व सामाजिक संघटना, रेस्क्यू टीम इत्यादी सुरक्षा टीम २४ तास तैनात करण्यात आली होती. त्यांनी या वेळी चांगली व्यवस्था पार पडली आहे. विसर्जनासाठी आलेल्या भाविकांनी निर्माल्य नदीपात्रात विसर्जन न करता प्रशासन सूचनेनुसार निर्माल्य कुंडात केले. तसेच मुर्त्यांचे कृत्रिम विसर्जन करून अनेक कुटुंबांनी आणि मंडळांनी मनपाकडे मुर्त्या दान केलेले आहेत. सांगली मिरज कुपवाड शहरातील जनतेने मोलाचे सहकार्य केले आहे.