| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. ३० सप्टेंबर २०२४
ब्रेन बुस्टर अबॅकस अकॅडमीच्या वतीने कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत कु. सादिया अल्लाबक्ष काझी हिने 1st Level गटात द्वितीय क्रमांक पटकावला. त्याबद्दल तिचा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिलडा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष असिफ निपाणीकर, समन्वयक शंकर परदेशी, कार्यवाह जहिर मुजावर, उपाध्यक्ष नरेश सातपुते, संतोष जेडगे, अमजद पठाण वसीम सय्यद, अभिजित दाणेकर आदी सदस्य उपस्थित होते. सादिया काझी ही ज्युबिली कन्या शाळेची इयत्ता 7 वीची विद्यार्थिनी असून ती सौ. स्नेहा शिंदे यांच्या ब्रेन बुस्टर अकॅडमी, मिरज येथे अबॅकस शिकते. सादियाच्या या यशाबद्दल मिरज शहरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.