| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३० सप्टेंबर २०२४
सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी समितीचे माजी सचिव व दक्षिण सातारा व सांगली लोकल बोर्डाचे पहिले अध्यक्ष स्वातंत्र्य सेनानी धुळाप्पांण्णा नवले यांच्या ३५व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम काँग्रेस कमिटी सांगली येथे आज आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा शहर काँग्रेस कांग्रेस सेवादलच्यावतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना माजी तहसीलदार विवेक अंकलीकर यांनी बोलताना स्वर्गीय स्वातंत्र्य सेनानी धुळाप्पांण्णा नवले यांनी महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचाराचा वारसा पुढे चालू ठेवून सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या उभारणीमध्ये तसेच काँग्रेस कमिटी उभारण्यामध्ये फार मोठे योगदान दिले आहे, त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षापासून महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील वैयक्तिक सत्याग्रहांमध्ये भाग घेऊन सातारा दक्षिण सातारा सांगली या लोकल बोर्डाचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधानपरिषदेवर ते 1968 साली आमदार म्हणून निवडून आले होते. तसेच स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण व स्वर्गीय पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या राजकीय जीवनामध्ये समझोता घडवून त्यांनी अंकलखोप येथे एकाच व्यासपीठावरती दोघांना आणण्याचे काम केले.
शिगावचे मधाळेसाहेब व त्यांनी अस्पृश्यता निर्मूलन समिती स्थापन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर काम केले आहे. अशा थोर स्वातंत्र्य सेनानीना मी भावपूर्ण आदरांजली वाहत आहे, विवेक अंकलेकर यांनी म्हटले.
यावेळी अनिल मोहिते कार्याध्यक्ष सांगली शहर जिल्हा काँग्रेस सेवादल यांनी धुळाप्पांण्णा नवले यांच्या जीवनातील काही प्रसंग सांगून सेवा दलाने थोर नेत्यांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त जो विचार लोकांपर्यंत ठेवत आहेत ते उल्लेखनीय आहे सेवा दलामुळे या महान नेत्यांच्या कार्याची ओळख या पुढील काळामध्ये युवकांना होत राहिल असे सांगितले. यावेळी स्वागत प्रास्ताविक शहर सचिव मौलाली वंटमोरे यांनी केले व शेवटी आभार विश्वास यादव यांनी मानले.
यावेळी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले सौ. प्रतीक्षा काळे, बाबगोंडा पाटील, नामदेव पठाडे, सुरेश गायकवाड, शमशाद नायकवडी, लालसाब तांबोळी, सचिन पाटील, संजय पाटील, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.