Sangli Samachar

The Janshakti News

अब्दुल सत्तार यांच्या मध्यस्थीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जरांगे पाटील यांची फोनवरून बोलणे, पण नेमकी चर्चा कोणती ?


| सांगली समाचार वृत्त |
अंतरवाली - दि. ५ सप्टेंबर २०२४
गेले अनेक महिने ज्यांनी प्रत्येक सभेत, प्रत्येक दिवशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर सातत्याने केली भाषेत टीका केली. परंतु आज त्यांच्याचबरोबर झालेले फोनवरून बोलणे महाराष्ट्रातील चर्चेचा विषय बनला आहे.

छत्रपती संभाजी नगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी अंतरवालीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. झालेल्या चर्चेनंतर सत्तार यांनी देवेंद्र फडणवीस व जरांगे यांची फोनवरून भेट घडवून दिली. वास्तविक फडणवीस आणि जरांगे यांची चर्चा मराठा आरक्षणावरून नव्हे तर शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी बाबत होती. जरांगे यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पुढील आठ दिवसात नुकसान भरपाई देण्याबाबत त्याचे नंतर जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


यावेळी जरांगे पाटील यांनी नेहमीच्या शैलीत बोलताना म्हटले की, तुम्ही आठ दिवसात देतो दहा दिवसात देतो असे सांगता परंतु दोन वर्षांनी ही नुकसान भरपाई मिळते. शेतकरी चहुबाजूने संकटात सापडला आहे. त्याला तात्काळ मदतीचे आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ मदत द्यावी अशी विनंती मी देवेंद्र फडणवीस यांना केल्याचे जरांगे पाटील म्हणाले. जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्याबरोबर शेतकऱ्यांच्या मदतीबाबत बोलण्याचे सांगितले जात असले तरी, याशिवाय इतरही जी चर्चा झाली, त्याबाबतही उत्सुकता ताणली गेली आहे.