Sangli Samachar

The Janshakti News

स्व. डॉ. पतंगराव कदम यांचं देखणं स्मारक व पुतळ्याचे अनावरण संपन्न; राज्य व देश पातळीवरील विविध मान्यवरांची उपस्थिती !


| सांगली समाचार वृत्त |
कडेगाव - दि. ५ सप्टेंबर २०२४
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते श्री. राहुल गांधी यांच्या हस्ते कडेगाव येथील महाराष्ट्राचे माजी मंत्री व सांगली जिल्ह्याचे दिवंगत नेते मा. डॉ. पतंगरावजी कदम यांच्या अत्यंत देखण्या व जिल्ह्याचे महत्त्वाचे ठिकाण ठरू शकणाऱ्या स्मारकाचे व पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या निमित्ताने देश व राज्य पातळीवरील अनेक दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर पहावयास मिळाले. 

यावेळी झालेल्या जाहीर सभेत बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या संभाषणाचा संदर्भ देऊन, श्री. राजीव गांधी म्हणाले की, खर्गे आपण कर्नाटकचे. मी जेव्हा जेव्हा आपणासोबत कर्नाटकात जातो, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर आनंद असतो, हास्य असते. परंतु महाराष्ट्र आल्यानंतरही तुमच्या चेहऱ्यावर आणि आनंद कसा असतो ? तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता खरगे म्हणाले की, महाराष्ट्राचे विचारधारा काँग्रेसची आहे, छत्रपती शिवाजी महाराज, आंबेडकर, फुले, शाहू यांची आहे. आणि म्हणून मला येथे आल्यानंतर इतका आनंद होतो. आणि हेच माझेही भावना आहे. महाराष्ट्र हा काँग्रेसच्या विचारधारेचा पाया आहे. आणि महाराष्ट्रातील जनतेच्या डीएनए मध्ये काँग्रेसचे विचारधारा आहे.

सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याचा उल्लेख करून राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी माफी मागितली, चुकीचे काम करणारेच माफी मागत असतात चूक केली नाही तर माफी मागायचे वेळेत नाही. म्हणून मोदीजींनी चुकीची जीएसटी आकारणी, नोटाबंदी, तरुणांची बेरोजगारी याबाबतही माफी मागायला हवी.


भारताला सामाजिक प्रगती हवी आहे, पण त्याचा फायदा काही निवडक लोकांनाच मिळतो. देशातील वीस ते पंचवीस उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपयांचे कर्ज सरकारने माफ केले. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्याही कर्ज माफ झाले पाहिजे असे राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना सांगितले. आम्हाला देशाचे राजकारण करायचं नाही तर प्रेमाचं आणि एकीचा राजकारण आम्हाला हवे आहे. परंतु सध्या राजकारण नव्हे तर वैचारिक लढा सुरू आहे.

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,खा. विशाल पाटील, राज्यातील काँग्रेसचे खासदार, आमदार, जिल्हा परिषद तसेच नगरपरिषदेचे सदस्य, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, यांच्याप्रमाणे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. या सभेला संपूर्ण सांगली जिल्ह्यासह सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातूनही जवळपास दोन लाख काँग्रेस प्रेमी उपस्थित होते.

या मेळाव्याच्या भव्यतेबरोबरच येथील सभेची शिस्त आणि उपस्थित असलेल्या नागरिकांची सोय याची चर्चा सभा संपल्यानंतर उपस्थित होती. कोणताही गोंधळ, ट्राफिक जाम, लोकांचे हाल असा कोणताही प्रकार संपूर्ण कडेगावकडे येणाऱ्या मार्गावर दिसून आला नाही. आणि याचे सारे श्रेय राज्याचे माजी मंत्री, काँग्रेसचे सांगली जिल्ह्यातील युवा नेते विश्वजीत कदम व त्यांच्या साऱ्या टीमचे आहे.