yuva MAharashtra जपान आणि रशियाला मागे टाकत, भारत बनला तिसरी महासत्ता, अजूनही यशस्वी घोडदौड सुरूच !

जपान आणि रशियाला मागे टाकत, भारत बनला तिसरी महासत्ता, अजूनही यशस्वी घोडदौड सुरूच !



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २५ सप्टेंबर २०२४
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भारताने महासत्ता बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू केले आहे. भारताची ताकद यापूर्वीच जगभरात दिसून आली आहे. आपल्या मुसद्दीगिरीने भारताने केवळ आर्थिकच नव्हे तर सर्वच क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती केली असून, जगभरातून मोदी-शाह यांचे कौतुक करण्यात येत आहे.

ऑस्ट्रेलिया येथील लोवी या संस्थेने जाहीर केलेल्या एशिया पॉवर इंडेक्सच्या क्रमवारीत भारत तिसरा महासत्ता बनला आहे. भारताचा स्कोर 39.1 तर जपानचा स्कोर 38.9 आहे. त्यामुळे तो चौथ्या स्थानावर घसरला आहे. अमेरिका आणि चीन अजूनही प्रथम व द्वितीय स्थानावर कायम आहेत . मात्र भारताकडे महासत्ता बनण्यासाठी अजूनही खूप मोठी संधी आहे .या क्रमवारीत पाकिस्तानची स्थिती खूपच वाईट आहे.

चीनची आर्थिक आणि लष्करी ताकद स्थिर आहे. आठपैकी सहा शक्तींच्या पॅरामीटर्समध्ये अमेरिका आघाडीवर आहे. पण भारताची स्थिती सुधारत आहे. जपान आणि रशियाला मागे टाकून भारताने आशियामध्ये तिसरे स्थान पटकावले आहे.

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आशिया पॉवर इंडेक्समध्ये भारताचं वर्चस्व वाढल्याने याचे श्रेय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. त्यांच्या दूरदर्शी दृष्टीकोन आणि जागतिक रणनीतीमुळे हे शक्य झाल्याचं त्यांनी म्हटले आहे. अहवालानुसार, 2023 मध्ये भारताने एशिया पॉवर इंडेक्स देशांसोबत सर्वाधिक देशांसोबत संवाद केला. भारत आपली राजनैतिक स्थिती मजबूत करत असल्याचे देखील या अहवालातून समोर आले आहे.

लोवी इन्स्टिट्यूटचा अहवालानुसार, आशियातील सत्ता जरी अमेरिका आणि चीनकडे असली तरी भारत हा देश आशिया खंडातील खास आणि महत्त्वाचा देश आहे. असे या अहवालात म्हटले आहे. हळूहळू भारताचे आर्थिक सामर्थ्य, लष्करी सामर्थ्य आणि मुत्सद्दी रणनीती वाढत आहे. ज्यामुळे भविष्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. शेजारी देश पाकिस्तानची स्थिती या क्रमवारीत डळमळीत आहे. या यादीत पाकिस्तान 14.4 व्या क्रमांकासह 16 व्या स्थानावर आहे.

भारताची सत्ता एका नव्या दिशेने पुढे जाण्याची शक्यता आहे. भारताने आपल्या साधनसंपत्तीचा योग्य वापर करत आपली मुत्सद्दी क्षमता वाढवली आहे. भारताच्या भूमिकेचा हा बदल केवळ भारतासाठीच नाही, तर संपूर्ण आशिया खंडासाठी महत्त्वाचा ठरेल.