| सांगली समाचार वृत्त |
नागपूर - दि. १५ सप्टेंबर २०२४
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांच्या नावावर नोंद असलेल्या ऑडीट कारच्या हिट अँड प्रकरणाचे आरोपी अर्जुन हावरे आणि मित्र रोनित चिंतमवार यांच्या चाचणीचे रिपोर्टर समोर आले असून, यावरून आता राजकीय वातावरण तापले आहे. मध्यरात्री झालेल्या या अपघातातील तब्बल सात तासानंतर तपासण्यात आल्याने तपासाबाबत शंका व्यक्त होत आहे.
या अपघातात कार चालवत असलेल्या अर्जुनच्या रक्तात अल्कोहोलचे प्रमाण 100 मिलीलिटर मागे 28 मिलेग्रॅम तर रोनितच्या रक्तात 25 मिलिग्रॅम इतके नोंदणी गेले आहे. वाहन चालवताना एखाद्या व्यक्तीच्या रक्तात, अल्कोहोलचे प्रमाण 100 मिलिमीटर मागे 30 मिलीग्रॅम इतके असलण्यास कायद्याने परवानगी आहे. त्यामुळे संख्येचे हे दोन्ही मित्र कायद्याच्या कचाट्यातून वाचले आहेत. अपघातानंतर काही वेळातच मेयो रुग्णालयाच्या डॉक्टरांनी केलेल्या प्राथमिक शारीरिक तपासणीमध्ये हे दोघेही दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट केले होते.
तज्ञांच्या मते अपघात झाल्यानंतर त्वरित अल्कोहोल की पातळी तपासली असती तर परिणाम चौकटीने वाढले असते. सात तासानंतर अल्कोहोल चाचणी केल्याने तिघांच्याही चाचणी अहवालात अल्कोहोलचे प्रमाण कमी दाखवले गेले आहेत. त्याचप्रमाणे रिपोर्टमध्येही छेडछाड केला असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. संकेत बावनकुळे यास यापूर्वीच रक्तातील अल्कोहोल पातळी चाचणीतून वाचवण्यात आले होते, तर आता अर्जुन आणि रोनित याचाही बचाव करण्यात येऊन, ही केस हिट अँड रन पासून वाचवण्यात आल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.