| सांगली समाचार वृत्त |
नागपूर - दि. १५ सप्टेंबर २०२४
केंद्रीय परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी हे स्पष्टवत्तेपणा आणि रोखठोक बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. अनेकदा त्यांनी अगदी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचेही कान टोचले आहेत. काल नागपूर येथील विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या स्व. अनिलकुमार पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात बोलताना, 'लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने आपल्याला पंतप्रधानपदाची ऑफर दिल्याचे' सांगून महाराष्ट्रातील राजकारणात मोठे खळबळ माजवून दिली.
यावेळी बोलताना ना. गडकरी म्हणाले की, या वरिष्ठ नेत्यांने मला दिलेली ऑफर नाकारून त्या नेत्याला सांगितले की, मी एक विचारधारा मारणारा व्यक्ती आहे. आणि अशा एका पक्षात आहे ज्याने मला जे हवे ते सर्व दिले आहे. त्यामुळे कोणताही प्रस्ताव मला मोहात वाढू शकत नाही. ना. गडकरी यांनी या वक्तव्यातून नेमका कोणाला आणि काय संदेश दिला, यातून त्यांना काय साध्य आहे, याबाबत आता सर्वत्र चर्चा सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आणि एकत्रितपणे देशभरात निवडणुका लढवल्या. याचा परिणाम असा झाला की, एनडीए साठी 400 चा आकडा पार करण्याचा दावा करणारा भाजपा बहुमताच्या आकड्यापासून दूर राहिला. मात्र, सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान, तर ना. नितीन गडकरी हे भाजपा सरकारमध्ये वरिष्ठ मंत्री झाले आहेत, या पार्श्वभूमीवर त्यांच्या वक्तव्याला 'विशेष किनार' आहे.