Sangli Samachar

The Janshakti News

साडेसात वर्षात महायुतीच्या नेत्यांना बहिणींचे दुःख दिसले नाही का ? पंधराशे रुपये पेक्षा महिलांची सुरक्षा मोठी - शरदचंद्र पवार


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १९ सप्टेंबर २०२४
सध्या संपूर्ण राज्यात लाडकी बहीण योजना फेमस झाली असून, सर्वत्र याचीच चर्चा आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यावर आता सप्टेंबर महिन्याचे १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण असून, याचा फायदा महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला होणार असल्याचे बोलले जात आहे.

अशा परिस्थितीत महाआघाडीत या योजनेवरून चलबिचल सुरू आहे. नुकतेच काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर यांनी या योजनेवरून महायुतीवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. एका हाताने लाडक्या बहिणींना १५०० रुपये द्यायचे. तर दुसरीकडे तेलाच्या आयात शुल्कात भरमसाठ वाढ करून दुसऱ्या हाताने ते काढून घ्यायचे अशी महायुतीची चाल असल्याचे वडेट्टीवर यांनी म्हटले आहे.


परंतु महाआघाडीचे प्रमुख असलेले राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही या योजनेवरून महायुतीला धारेवर धरलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन टर्म झाले आहेत. आता तिसरी टर्म सुरू आहे. महाराष्ट्रातील एका कार्यक्रमात त्यांनी लाडक्या बहिणीचं कौतुक केलं मात्र त्यांच्या व्यथा आणि दुःख त्यांना दिसले नाही का ? असा थेट सवाल शरद पवार यांनी केला आहे. लहान मुली व महिलांवरील अत्याचार वाढले असताना, लाडक्या बहिणीचे कौतुक कसले करता ? असा बोचरा सवालही शरदचंद्र पवार यांनी विचारला असून, लाडक्या बहिणी योजनेचा फायदा महायुतीला होईल असे वाटत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.