Sangli Samachar

The Janshakti News

महापालिकेकडून आता रस्त्याच्या खाली असणाऱ्या पाईप लाईनचे करणार रोबोद्वारे सर्व्हेक्षण, सांगलीत प्रात्यक्षिक संपन्न !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ सप्टेंबर २०२४
सांगली मिरज कुपवाड महापालिकेकडून आता रस्त्याच्या खाली असणाऱ्या पाईप लाईनचे सर्व्हेक्षण करण्यासाठी रोबोचा वापर केला जाणार आहे. 

मा शुभम गुप्ता आयुक्त यांच्या सूचनेनुसार यासाठी तामिळनाडू येथील सोलिना इंटेजीटी या कंपनीकडून आज अंडर ग्राउंड रोबोचा डेमो घेण्यात आला. हा रोबो रस्त्याच्या खाली असणाऱ्या ड्रेनेज पाईप मध्ये 400 फुटापर्यंत जाऊन पाईपचे निरीक्षण करीत त्याची स्थिती कळवणार आहे. या टेक्नॉलॉजीमुळे आता रस्ते खुदाई बरोबर अंडर ग्राउंड मेंटेनन्स करण्याचा वेळ आणि खर्च वाचणार आहे. 


आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर असणाऱ्या चेंबर मध्ये याचा डेमो उपआयुक्त वैभव साबळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे, अभियंता तेजस शहा, विनायक जाधव आणि सोलिना इंटेजीटी कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.