| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३० सप्टेंबर २०२४
गुजरातच्या अदानी फाउंडेशनकडे राज्यातील नऊ शाळांचे व्यवस्थापन हस्तांतरित करण्याच्या युती सरकारने घेतलेल्या निर्णयावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. आता महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थाही अदानींच्या ताब्यात देणार का ? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस शहरात असलेले माउंट कार्मेल कॉन्व्हेंट पक या शाळेचे व्यवस्थापन राज्याच्या शिक्षण विभागाने गुजरात मधील अदानी फाउंडेशनकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे ही शाळा विना अनुदानित असून येथे पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण उपलब्ध आहे. शाळेचे व्यवस्थापन अदानी फाउंडेशन कडे सोपवत असताना काही शर्ती व अटी ठेवण्यात आले आहेत.
महाराष्ट्र शासनाने याबाबत एक जीआर काढला असून त्यानुसार शाळेचे कामकाज अदानी फाऊंडेशन अहमदाबादकडे सोपविण्यात आले आहे, या संदर्भात, 30 जुलै रोजी शिक्षण उपसंचालक, नागपूर यांना पत्र पाठवले होते. अदानी समूहाच्या वतीने, या पत्राच्या आधारे, परंतु 27 सप्टेंबर 2024 रोजी जीआर जारी करण्यात आला आहे आणि काही अटी व शर्तीनुसार शाळेचे कामकाज अदानी समूहाकडे सोपवण्यात आले आहे. ही शाळा गेल्या 50 वर्षांपूर्वी स्थापन झाली असून ती ACC सिमेंट कंपनीच्या देखरेखीखाली चालवली जात होती.
कोळसा खाणे आणि सिमेंट उद्योग यामुळे चंद्रपूर मधील घुग्घुस हे औद्योगिक शहर असून एसएससी या प्रसिद्ध सिमेंट या ठिकाणी कारखाना आहे. सध्या या कारखान्याची मालकी आदानी ग्रुपकडे आहे. आणि याच कारखान्यातील मुलांसाठी माउंट कार्मेल या मिशनरी संस्थेने ही शाळा उभारली होती. आता अदानी फाउंडेशन स्कूल असे नामकरण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.
यावरून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी युती सरकारवर धारदार टीका केली आहे महाराष्ट्राचा सातबारा आता अदानींच्या नावे लिहिणार का ? असा सवाल त्यांनी केला आहे. धारावी येथील जमिनी, एअरपोर्ट, वीज कंपनी महाराष्ट्र शासनाने अदानींच्या घशात घातली आहे. आता महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेवर ही अदानींचा डोळा असल्याने, ही महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरा असलेल्या शिक्षण व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा असल्याचे वडेट्टीवर यांनी म्हटले आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी लावण्यात आलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोंबरोबरच आता गौतम अदानी यांचा फोटो लावण्याची तयारी शिंदे सरकारने केली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.