Sangli Samachar

The Janshakti News

म्हैशाळ दुर्घटना प्रकरणी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखाची मदत - ना. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांची घोषणा


| सांगली समाचार वृत्त |
म्हैशाळ - दि. ३० सप्टेंबर २०२४
जनावरांसाठी चारा काढावयास गेलेल्या एकाच घरामधील वनमोरे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याचे माहिती मिळताच, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जावून विचारपूस केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनी व चर्चा केली व मृतांच्या नातवेकांना प्रत्येकी पाच लाख रुपये तर हेमंत वनमोरे या जखमीवर उपचाराचा संपूर्ण खर्च शासन करणार असल्याचे जाहीर केले.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी ते म्हैसाळ मध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. तर एक लहान मुलगा गंभीरित्या जखमी झाला. हे सर्वजण शेतात जनावरांसाठी चारा काढण्यात करीत आहात गेले होते. यावेळी शेतात विद्युत पुरवठा करणारी तार तुटून पडली होती. या तारेला स्पर्श होऊन तिघा दत्तू झाला तर एक लहान मुलगा जखमी झाला आहे. पारिशनाथ मारुती वनमोरे, साईराज वनमोरे व प्रदीप वनमोरे अशी मृत्यू पावलेले यांचे नावे आहेत तर हेमंत वनमोरे असे जखमी मुलाचे नाव आहे.