Sangli Samachar

The Janshakti News

'तर' अमित शहा यांचा राजकीय एन्काऊंटर होईल, मनोज जरांगे यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यात खळबळ !


| सांगली समाचार वृत्त |
अंतरवाली - दि. ३० सप्टेंबर २०२४
जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी अत्यंत आक्रमक वक्तव्य करीत आहेत. विशेषतः त्यांचा रोख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. दरम्यान त्यांनी केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांना राजकीय एन्काऊंटरचा थेट इशारा दिल्याने राजा खळबळ माजली आहे.


अमित शहा नुकतेच दौऱ्यावर येऊन गेले. यावेळी त्याने मराठा आंदोलनावर भाष्य करताना, ' असे अनेक आंदोलने हाताळली आहेत त्याचप्रमाणे मराठा आंदोलने ही व्यवस्थित हाताळू' असं म्हटलं होतं. यावरून मनोज जरांगे यांनी अमित शहा यांना उद्देशून म्हटले की, ' मराठ्यांना बाजूला ठेवलं की तुमची गोड चूक असेल त्यामुळे मराठ्यांचे आंदोलन हाताळण्याच्या भानगडीत पडाल तर तुमचा राजकीय एन्काऊंटर होईल.' त्यांच्या या वक्तव्याने महाराष्ट्रात कळवळ माजली आहे.

यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या आधी मराठा ओबीसी मधून आरक्षण देण्याचा अध्यादेश काढावाच लागणार आहे. माझ्या सत्ता स्थापन करू शकत नाही. जर तुम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं तर तुम्हाला सत्तेवर घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असंही त्याने म्हटलं आहे.