Sangli Samachar

The Janshakti News

लग्नाळू भावांकडून मुख्यमंत्र्यांना डीजेच्या गाण्यातून, आमच्यासाठीही योजना आणण्याचे घातले गाऱ्हाणे; ऐकणाऱ्यांची हसून पुरेवाट !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १७ सप्टेंबर २०२४
महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दीड हजार रुपये मिळावेत याकरता महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आहे. या योनजेसाठी राज्यभराली कोट्यवधी महिलांनी अर्ज केले आहेत. तर, आतापर्यंत जवळपास दीड लाखांहून अधिक महिलांना या योजनेतील सन्मान निधीही मिळाला आहे. यावेळी महिला वर्ग खूश झाला, मात्र दुसरीकडे पुरुष वर्ग मात्र आमच्यासाठी काय असं म्हणत थेट मुख्यमंत्र्यांनाच सवाल विचारत आहे. हा लाडक्या भावांवर अन्याय आहे, फक्त बहि‍णींनाच का योजना असे अनेकजण सवाल करत असताना आता थेट मुख्यमंत्र्‍यांना तरुणांनी गाण्यातूनच विनंती केलीय. लाडक्या भावाचं हे गाण ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल.

आतापर्यंत तुम्ही डीजेवर अनेक गाणी ऐकली असतील तसेच डीजेवर वाजणाऱ्या गाण्यांवर डान्स केला असेल. पण या व्हिडीओमध्ये असं गाण वाजलं की ऐकणारे ऐकत राहिले आणि नाचणारे नाचत राहिले. असं काय आहे हे गाणं तुम्हीच पाहा. 'आमचं लग्न होईना कुणी पोरगी देईना, हाताला काम नाही, मुख्यमंत्री आमच्यासाठी पण काढा लाडका भाऊ योजना, मुख्यमंत्री मुलांसाठी पण काढा लाडका भाऊ योजना.' असं गाण हे डीजेवर वाजत आहे. यावेळी सगळे तरुण या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. हे गाणं इतक्या भन्नाट पद्धतीने गायलंय की ऐकल्यावर आपसूकच हसू येतंय. तर तरुणही यावर बेभान होऊन नाचत आहेत.


सोशल मीडियावर हा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओला साहेब आहे आमच्या साठी काही योजना असं कॅप्शन्स दिलं आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केलीय, 'भाऊ लाडका नाहीये.' तर आणखी एकानं कमेंट केलीय, 'एक नंबर''