Sangli Samachar

The Janshakti News

अन्यथा एक नोव्हेंबर पासून तुम्हाला रेशन कार्ड वरून धान्य मिळणार नाही... आजच करा पूर्तता !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १६ सप्टेंबर २०२४
दारिद्र्य रेषेखालील आणि मध्यमवर्गीयांना स्वस्त दरात धान्य मिळावे म्हणून, केंद्र शासन गेली अनेक वर्ष रेशन कार्डच्या माध्यमातून स्वस्थ धान्य उपलब्ध करून देत आहे. परंतु याचा फायदा गोरगरीब व गरजू लोकांना होण्याऐवजी, ते धान्य खुल्या बाजारात विकण्याबरोबरच, या धान्याचा काळाबाजार ही होत होता. हे गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र शासनाकडून वेळोवेळी या योजनेत सुसूत्रता आणण्यासाठी नवीन नियम केले. इतकेच नव्हे तर सातत्याने यात बदल केला जात आहे. 

यातील काळाबाजार रोखण्यासाठी केंद्राने केवायसी करणे बद्दल कार्य केले होते. परंतु अद्यापही अनेक रेशन कार्डधारकांनी अशी केवायसीची पूर्तता केलेली नाही. म्हणून 31 ऑक्टोंबर पर्यंत जे रेशन कार्डधारक केवायसी पूर्तता करणार नाहीत, त्यांना एक नोव्हेंबर पासून रेशनकार्डवर स्वस्त धान्य मिळणार नाही असे अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने जाहीर केले आहे.


या केवायसी च्या बंधनाबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. आमच्या हक्काचे धान्य मिळण्यासाठी केवायसी बंधनकारक का ? असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना या विभागाने म्हटले आहे की, ज्या व्यक्ती हयात नाहीत त्यांची नावे अजूनही रेशन कार्ड वरून कमी केलेली नाहीत. त्याचप्रमाणे मोफत रेशन मिळण्याच्या योजनेसाठी जे पात्र नाहीत, अशा व्यक्तींचे रेशन कार्डही अद्याप सुरू आहे. त्यामुळे ज्या व्यक्ती, जे कुटुंब या योजनेसाठी पात्र आहे अशांपर्यंत रेशन कार्ड वरील धान्य पोहोचू शकत नाही. त्यामुळे योग्य व्यक्तींपर्यंत या योजनेतील धान्य पोहोचण्यासाठी केंद्र शासनाने केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे. आणि म्हणूनच अद्यापही ज्या रेशन कार्डधारकांनी केवायसी ची पूर्तता केली नाही त्यांनी तात्काळ ती पूर्तता करून घ्यावी, असे या विभागाकडून कळविण्यात आले आहे.