| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० सप्टेंबर २०२४
शहरातील संजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आले असून त्याच्या उघडकीस आले आहेत
अमीर हुसेन शेख (वय 22, रा. सहारा चौक, संजय नगर, सांगली ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या एक लाख रुपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती संजय नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बयाजीराव कुदळे यांनी दिली आहे.
दुचाकी आमिर शेख यांनी चोरल्याची माहिती पथकाला खबऱ्यामार्फत मिळाली होती. तेव्हा सहारा चौक परिसरात सापळा रचून शेख याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने अभयनगर, विद्यानगर, वारणाली, हडको कॉलनी इत्यादी ठिकाणाहून दुचाकी चोरल्याचे कबूल केले. पोलिसांनी अमीर शेख याच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आले आहेत.
शहरातील हडको कॉलनी येथील दर्शन बोथे यांची दुचाकी 4 सप्टेंबर 2024 रोजी चोरीला गेली होती. याप्रकरणी बौद्ध यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची तक्रार दाखल केली होती यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक घेत होते. याप्रकरणी संजय नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बयाजीराव कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक गायकवाड, विनोद साळुंखे, संतोष पुजारी, कपिल साळुंखे, नवनाथ देवकाते, सुशांत लोंढे, आकाश गायकवाड आणि यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.