Sangli Samachar

The Janshakti News

30 हून अधिक लाडक्या बहिणीची भाऊबीज साताऱ्यातील भंपक भावाने केली हडप, सर्वत्र खळबळ ! तुमचे नाव तर त्यात नाही ना ?


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३ सप्टेंबर २०२४
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात महिला वर्गामध्ये एकच चर्चा आहे, "तुमच्या खात्यावर साडेचार हजार रुपये जमा झाले का ?" कारण यासाठी करावयाच्या अर्जात सुरुवातीला अनेक त्रुटीमुळे अनेक बहिणींचे अर्ज स्वीकारले गेले नाहीत. यामध्ये सुसूत्रता आणित महाराष्ट्र शासनाने या योजनेमार्फत महिलांच्या खात्यावर साडेचार हजार रुपये जमा केले. मात्र अनेक बहिणींच्या खात्यावर ते जमा होऊ शकले नाहीत. सदर महिला याबाबत शासन असून आपल्यालाही पैसे मिळतील का असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

परंतु एक नवीन धक्कादायक माहिती नुकतेच उघड झाल्याने, बहिणींच्या खात्यावर पैसे न जमा न होण्यामागे एक मोठा फ्रॉड असू शकतो अशी शंका व्यक्त होत आहे. नुकताच पनवेल येथे याबाबतचा एक फ्रॉड उघडकीस आल्यानंतर शासकीय यंत्रणेतील अनागोंदी कारभारही समोर आला आहे. त्यामुळे महिला वर्गातून मोठी नाराजी व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, खारघर येथील पूजा प्रसाद महामुनी यांचा अर्ज वारंवार भरून देखील सबमिट होत नसल्याने त्याने भाजपाचे खारघर मधील माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्याकडे याबाबत तक्रार केली. तेव्हा निलेश बाविस्कर यांनी याबाबत तपासणी केली असता महामुनी यांच्या नावाने अर्ज मंजूर झाला असल्याचे ऑनलाईन दिसून आले. परंतु सदर अर्जामध्ये मोबाईल नंबर मात्र सातारच्या जाधव नामाच्या एका व्यक्तीचा असल्याचे आढळले, इतकेच नव्हे तर या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 30 अर्ज भरल्याचेही आढळले. हा प्रकार समोर आल्यानंतर बाविस्कर यांनी त्वरित पनवेलचे नायब तहसीलदार संजय भालेराव यांच्याकडे यांना याबाबतची माहिती दिली.


वास्तविक योजनेची रक्कम संबंधित बहिणीच्या नावे तिच्या अधिकृत बँकेत जमा होत असते आणि यासाठी आधार कार्ड हा महत्त्वाचा असतो, जो बँक खात्याशी जोडलेला असतो. असे असूनही या 30 महिलांची रक्कम सातारा येथील जाधव नामक व्यक्तीने अर्ज केलेल्या पत्नीच्या खात्यावर कशी जमा झाली ? याचा शोध घेऊन संबंधित व्यक्तीसह, याला जबाबदार असणाऱ्या अन्य व्यक्तींनाही कडक शासन व्हावे, अशी मागणी महिला वर्गातून होत आहे.