Sangli Samachar

The Janshakti News

मानवतेबद्दल निस्वार्थी श्रद्धा असलेल्या आदिवासींना सहकार्य करणे आपले कर्तव्य आहे - पृथ्वीराज पाटील यांचे प्रतिपादन


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २० ऑगस्ट २०२४
आदिवासी समाज हा भारतातील मूलनिवासी आहे. आज देशातील जंगलप्रवण क्षेत्र त्यांच्यामुळे सुस्थितीत आहे. पर्यावरण संरक्षणात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांची संस्कृती, भाषा, हक्क यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना सहकार्य केले पाहिजे हा प्रमुख उद्देश जागतिक आदिवासी दिनाचा आहे असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले. जागतिक आदिवासी गौरव दिन उत्सव समिती सांगलीवाडी आयोजित आदिवासी बांधवांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संदीप वरठा होते.


प्रमुख पाहुणे आदिवासी रानकवी तुकाराम धांडे, प्रमुख वक्ते निलेश डामसे यांनी खूप चांगल्या प्रकारे आदिवासी समाजाच्या व्यथा मांडल्या. मेळाव्याचे आयोजक दासू गावीत, मगन बरफ, शंकर महाले, मनिष वसावे, किरण बंगाल, आनंद इंफाळ, रविंद्र गावित, सुनिल देशमुख, मनोहर साबळे, योगेश गावडे, बाळा कुंभार, नरेंद्र व मनू बागुल, कैलास जाधव, जितेंद्र खोटरे, कृष्णा साबळे, प्रमोद भोई तसेच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.