Sangli Samachar

The Janshakti News

बांगलादेश जळतोय, पाकिस्तान रसातळाला जातोय, पण भारत नरेंद्र मोदी यांच्यामुळे ताठ मानेने उभा आहे !



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ९ ऑगस्ट २०२४
इकडे बांगलादेश जळतो आहे, तिकडे पाकिस्तान रसातळाला जातो आहे. पण भारत मात्र अनेक संकटाशी सामना करीत ताठ मानेने उभा आहे. भारतातही गेल्या दहा वर्षात सरकार विरोधात अशीच परिस्थिती निर्माण अनेकदा झाली. नोटाबंदीपासून शेतकरी आंदोलनांपर्यंत अनेक प्रसंग आले. विरोधी पक्षाने रान उठवले, अनेक आरोप झाले. भाजपावर नाराज असल्याची आवई उठवली गेली. परंतु तरीही नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वाखाली भाजपा तिसऱ्यांदा सत्तारूढ झाला.

2014 साली केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक त्सुनामी आली. सर्वच पक्ष यामध्ये वाहून गेले. नरेंद्र मोदी भाजपच्या माध्यमातून सत्तारूढ झाल्यानंतर, अनेक कटू निर्णय घेतले. आर्थिक बदल केले. सत्तर वर्षातील पंतप्रधानांनी जितके परदेश दौरे केले नाहीत, तितके दौरे नरेंद्र मोदी यांनी केल्याची टीका झाली. पण याच दौऱ्यांनी जगाच्या पाठीवर भारताचा कणा ताठ झाला तो केवळ नरेंद्र मोदी यांच्याचमुळे. 


नुकत्याच झालेल्या बांगलादेशातील राजकीय उठावाचा संदर्भ नरेंद्र मोदी यांना लावला जात आहे. काँग्रेसचे सलमान खुर्शीद, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी बांगलादेशात होतंय तर भारतात का नाही ? असा प्रश्न विचारला. नॅशनल कॉन्फरन्सच्या फारूक अब्दुल्लांनीही तोंड सुख घेतले. ठाकरे शिवसेनेचे शिलेदार हे तर नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलताना थकत नाहीत. इतर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनीही त्यांना टारगेट केले मग. मात्र या सर्वांना नरेंद्र मोदी यांनी बेदखल करीत आपली वाटचाल सुरू ठेवली आहे.

सध्या आरक्षणाचा मुद्दा भारतातही पेटला आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने 2019 पासूनच सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आ आता असलेल्या लोकांना दहा टक्के आरक्षण लागू केले आहे त्यासाठी राज्यघटनेत 103 वी घटना दुरुस्ती करण्यात आली. यावेळी विरोधकांनी मंडल आयोगाचा दाखला देत, मोठा गहजब केला. परंतु तरीही नरेंद्र मोदी ठाम होते व आहेत. या पार्श्वभूमीवर ई डब्ल्यू एस कोटा लागू करण्यापूर्वीच राजकीय सहमती मिळवण्यात मोदी सरकारला यश आले. इतका दिसून आला की सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर पसंतीचे मोहर लावली. विशेष म्हणजे काँग्रेसनेही मनमोहन सिंग सरकारच्या काळातच हा कोटा लागू करण्याची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू झाली होती असे सांगत मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले.


370 वे कलम हटवून जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतला. तत्पूर्वी कोणाला साधी कल्पनाही दिली नव्हती. नरेंद्र मोदींच्या दहा वर्षाच्या कार्यकाळातील सर्वात मोठे यश म्हणावे लागेल.

राम मंदिर उभारून भाजपच्या अजेंड्यावरील एक महत्त्वाचा विषय प्रत्यक्षात आणला. यादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने पवित्र राम जन्मभूमी वादावर ऐतिहासिक निर्णय दिला होता. मात्र समस्त हिंदूंच्या बाजूने या निर्णयाबाबत यापूर्वी विविध शंका उपस्थित केल्या जात होत्या, तरीही राम मंदिर पूर्णत्वास नेऊन नरेंद्र मोदी यांनी आपला शब्द खरा केला. नोटाबंदी असो, 370 रावे कलम हटवणे असो किंवा मग, देशाला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी आर्थिक सुधारणा असोत, कुणाचाही मुलाहिजा न ठेवता नरेंद्र मोदी यांनी '56 इंच छातीची' मर्दुमकी दाखवून दिली. 

आता येणाऱ्या काळात असलेला कार्यकाळ भारताला उच्च स्थानी घेऊन जाण्याचे स्वप्न नरेंद्र मोदी यांनी बाळगले आहे. भले यासाठी 'चारशे पार'चे स्वप्न धुळीला मिळाले तरी, बहुमताचा जादुई आकडा त्यांच्यासोबत आहे. आणि 'मोदी हे तो मुनकीन है |' हा विश्वास ते सार्थ करतील असा आत्मविश्वास स्वपक्षीयातील वा संघातील काही मूठभरांना नसला तरी, मोदी भक्तांना निश्चित आहे.