Sangli Samachar

The Janshakti News

झारखंड येथील मजुराच्या खात्यात जमा झाले सव्वा कोटी रुपये, चौकशी अंती धक्कादायक प्रकार आला समोर !


| सांगली समाचार वृत्त |
रांची - दि. ३१ ऑगस्ट २०२४
हातावरचं पोट. सकाळी मिळवायचं आणि संध्याकाळी खायचं. अशा परिस्थितीत आपल्या बँक खात्यात जर अचानक एक कोटी रुपये आले तर काय अवस्था होईल ?... असाच प्रकार झारखंड येथील चतरा जिल्ह्याच्या अंतर्गत मधील रहिवासी असलेल्या मजुरा सोबत घडली आणि त्याची झोपच उडाली.

याबाबत अधिक माहिती अशी की काही दिवसापूर्वी संदीप रावत नावाच्या व्यक्तीने संतोष मिस्त्री या मजुराला नटराज कंपनीत नोकरीचे आमिष दाखवले. त्याच्यासोबत इतर 25 मजुरांनाही काम देण्याचे आश्वासन दिले. तेव्हा संतोषने आपल्या अकरा सहकाऱ्यांना तयार केले. यावेळी संदीप रावतने या सर्व लोकांच्या बँक खात्यांची माहिती मागवली आणि सर्व मजुरांच्या बँक खात्यात चुकीच्या पद्धतीने संतोष मिस्त्रीचा मोबाईल नंबर लिंक केला. आणि रावत याने त्याच्या बँक खात्यात प्रथम चोवीस हजार आणि नंतर एक कोटी रुपये जमा केले व स्वतःच हे बँक खाते ऑपरेट करण्यास सुरुवात केली.


दरम्यानच्या काळात बँकेकडून संतोष मेस्त्री याला त्याच्या खात्यात सव्वा कोटी रुपये जमा झाल्याचा मेसेज पाठवला. संतोषने बँक व्यवस्थापकाशी संपर्क साधल्यानंतर संदीप रावतचा खेळ लक्षात आला. तेव्हा संतोषने हे खाते गोठवण्यास सांगितले. सध्या सर्व या प्रकाराची चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप पोलिसांमध्ये तक्रार न झाल्याने संदीप रावतवर गुन्हा नोंद झाला नाही.