| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ ऑगस्ट २०२४
येथील सांगली ते अंकली रस्त्यालगत कालिका मंदिर परिसर, कुंभार प्लॉट, गंगू तेलीनगर, सिद्धिविनायक कॉलनी, भंगार बाजार, खिलारेनगर परिसर, उदय हॉटेल या परिसरात साचलेले पावसाचे पाणी काल महापालिकेने जेसीबी यंत्राव्दारे हटवले. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी परिसराची पाहणी करून, आयुक्तांना दूरध्वनीवरून परिस्थितीचे गांभीर्य समाजावून सांगितले. त्यानंतर कामाला गती देण्यात आली.
सलग पावसामुळे या भागात तीन दिवसांपासून पाणी साचून राहिले होते. याबाबत माजी नगरसेवक रजाक नाईक यांनी पृथ्वीराजबाबा पाटील यांच्याशी संपर्क साधला व नागरिकांची अडचण सांगितली. तेव्हा त्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या भागात गुडघ्याएवढे पाणी साचून राहिले होते. नागरिकांना जाणे-येणे कठीण झाले होते. लहान मुलांना रस्त्यावरून चालणे अशक्य झाले होते. गेली दहा ते पंधरा वर्षे नागरिक या ठिकाणी राहत आहेत. नागरिकांना राहायला जाण्याकरता चांगले रस्ते नाहीत. ड्रेनेजची सुविधा किंवा पाणी निचरा होण्यासाठी कोणतेही साधन नाही, याबाबत महापालिका आयुक्त, उपायुक्तांशी पृथ्वीराज पाटील यानी संपर्क साधून तीव्र नाराजी व्यक्त केली.
तातडीने यावर कार्यवाही करा, अन्यथा आम्ही खासगी यंत्रणा लावून काम करून घेऊ, असे सांगितले. साचून राहिलेले पाणी कसे काढता येईल यावर अधिकाऱ्यांना पाचारण करून चर्चा करण्यात आली. आणि जेसीबी यंत्राने काम सुरु झाले. पाणी निचरा करण्यासाठी लागणारी यंत्रणा दाखल होऊन काम सुरु करण्यात आले.
यानंतर कालिकानगर येथील गल्ली क्रमांक तीन येथे विद्युत वायर फार खाली आल्या होत्या. त्यामुळे मोठी हानी होऊ शकते, याबाबत चर्चा करण्यात आली. विद्युत विभागातील अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने वायरची उंची वाढवून घेण्यात आली.
यावेळी मन्सूर नाईक, मधुकर कांबळे, विनायक कुलकर्णी, सुयोग आवळे, सूरज कांबळे, श्री. जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.