Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीतील रुग्णावर यशस्वी फुफुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी आणि श्वास हॉस्पिटलचे यश !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ ऑगस्ट २०२४
सलग आठ तास शस्त्रक्रिया करून सांगलीतील एका वीस वर्षाच्या तरुणाचे फुफ्फुस प्रत्यारोपण करण्यात यश आले. पुणे येथील डीपीयु सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आणि सांगलीतील श्वास हॉस्पिटल यांच्या सहकार्याने ही शस्त्रक्रिया पार पडली. सांगली जिल्ह्यातील अशा प्रकारचे हे पहिलीच शस्त्रक्रिया होय. डीपीयू सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे फुफुस प्रत्यारोपण तज्ञ डॉ. राहुल केंद्रे आणि श्वास हॉस्पिटलचे डॉ. अनिल मडके यांनी ही माहिती पत्रकार बैठकीत दिली.

51 वर्षे अभियंत्यांना गेले दोन वर्षापासून लंग फायब्रोसीस या आजाराने ग्रासले होते. त्यांचे जीवन केवळ ऑक्सिजनवर अवलंबून होते. अति त्रासामुळे त्यांना आपली नोकरी हे सोडावी लागली. दोन वर्षापासून श्वास लाइफ केअर हॉस्पिटलचे संचालक श्वसन विकार तज्ञ डॉ. अनिल मडके हे रुग्णावर उपचार करीत होते. परंतु उपचाराला रोगनाकडून प्रतिसाद मिळत नव्हता. योग्य ते औषधोपचार करूनही रुग्णाचा आजार बळावर चालला होता. आराम करीत असतानाही त्यांना ऑक्सिजनची गरज भासत होती. 


ही परिस्थिती लक्षात घेऊन डॉ. अनिल मडके यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना पिंपरी-पुणे येथील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रत्यारोपण तज्ञ डॉ. राहुल केंद्रे यांना भेटण्याचा सल्ला दिला, तेव्हा त्यांनी प्रत्यारोपण करण्याची गरज असल्याचे सांगितले. याबाबतची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रोहणाचे डीपी व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पुणे पिंपरी येथे संपूर्ण तपासणी करण्यात आली. पूर्ण प्रत्यारोपण शस्त्रक्रियेस असल्याचे निदान झाल्यानंतर, त्यांना zibo मार्फत Noton च्या यादीत फुफुस बदलण्यासाठी समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे शस्त्रक्रिया नंतर रुग्ण लवकर बरे होण्यास मदत झाली. 

४ जून रोजी एका मेंदू मृत रुग्णाच्या परिवाराने अवयव दानाचा धाडसी निर्णय घेतला होता आणि अवयवाच्या प्रतीक्षा यादीतील रुग्ण विजयकुमार जाधव यांना ztcc मार्फत अवयव मिळाले. डॉक्टर संदीप अट्टावार यांच्या नेतृत्वाखाली तज्ञ सर्जन च्या टीमने 12 तासात ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यानंतर तीन आठवड्यांनी ऑक्सिजन सपोर्ट शिवाय रुग्णाला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. सध्या जाधव हे स्वस्त असून कुठल्याही मदतीशिवाय आपले सुदृढ आयुष्य जगत आहेत.

डीपी यु सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पिंपरी पुणे व श्वसन विकार तज्ञ डॉक्टर अनिल मडके यांचे श्वास लाईफ लाईन सेंटर सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने बायरगण विभाग कार्यरत आहे. या सुविधेमुळे हृदय व फुफुसा संबंधित रुग्णांना तज्ञांचे समुपदेशन व मार्गदर्शन मिळणे शक्य झाले आहे या उपीद द्वारे सांगली आणि आसपासच्या भागातील रुग्णांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. 

डॉक्टर केंद्रे अधिक माहिती देताना म्हणाले की, फुफुसा संबंधित दुर्धर व बरे होऊन शकणारे रुग्ण, covid मुळे लंग फ्रायबोसीस झालेले रुग्ण, अंथरुणावर खेळलेले तसेच ऑक्सिजनवर अवलंबून असणाऱ्या रुग्णांसाठी आवश्यक उपचार व फुफ्फुस किंवा हृदय प्रत्यारोपण सुविधा आणि यासंबंधी आजाराबाबत देखील मार्गदर्शन व प्रत्यारोपण सेवांचे लोकांना माहिती आणि त्याचा प्रसार होणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी डी पी यु स्पेशलिटी हॉस्पिटलचे महाव्यवस्थापक, विपणन अधिकारी दीपक पाटील उपस्थित होते.

डॉक्टर अनिल मडके म्हणाले की देशातील पाच लाख लोक भारताच्या प्रतीक्षेत आहेत. दरवर्षी 4600 फुफुसाचच्या प्रत्यारोपणाची गरज आहे. आपल्याकडे अद्यापही अवयव दाना बाबत मानावी तशी जनजागृती नाही. रुग्णांमध्ये जिद्द असेल तर फुफुस प्रत्यारोपण केलेला ऋण आठ ते दहा वर्षे सहज जगू शकतो. त्यामुळे याबाबत अशा प्रकारच्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनी श्वास लाईफ लाईन सेंटर सांगली येथे संपर्क साधावा असे आवाहनही डॉ. आणि मडके यांनी यावेळी केले.