| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ ऑगस्ट २०२४
पालकमंत्री  तथा कामगार मंत्री ना. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते निवड  झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले. आज  विविध पदासाठी ४८१ पर्यत अर्ज प्राप्त झाले होते. त्यामधून १७३ जणांची निवड करण्यात येणार आहे, त्यापैकी निवड  झालेल्या ३३ उमेदवारांना  नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. 
ना. डॉ. सुरेशभाऊ खाडे पालकमंत्री तथा कामगार मंत्री  यांनी उपस्थितीत उमेदवारांना मार्गदर्शन करताना सांगितले की, महापालिकेत निवड झालेल्या उमेवारांनी चांगली सेवा करावी.  शासन स्तरावर आम्ही या प्रशिक्षणातून अनुभव घेतलेल्या या उमेदवारांना नोकर भरतीवेळी प्राधान्याने नोकरीची संधी उपलब्ध करून द्यावी , अशी विनंती करणार आहे.  येणाऱ्या काळात आम्ही तरुण पिढीसाठी  नवं उद्योग निर्मिती साठी प्रयत्न करणार आहोत.
ना. डॉ. सुरेशभाऊ खाडे पालकमंत्री  तथा कामगार मंत्री यांनी, शुभम गुप्ता यांनी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यापासून महापालिका कामकाजात नक्की चांगला, सकारात्मक फरक झाला आहे असे नमूद केले आहे.
यावेळी ना. डॉ. सुरेशभाऊ खाडे पालकमंत्री  तथा कामगार मंत्री  यांनी आपल्या यशस्वी कारकीर्द, वाटचाली बाबत उपस्थितीना अनुभव सांगितले. कामगार ते कामगार मंत्री ते पालकमंत्री हा प्रवास कसा झाला, याबाबत  मनमोकळेपणाने अनुभव सांगून उपस्थिताचे मनोबल वाढविले आहे.
यावेळी उपआयुक्त वैभव साबळे, सहा. आयुक्त आस्थापना विनायक शिंदे, जमीर बादशाह करीम, सहा. आयुक्त जिल्हा कोशल्य विकास  रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांच्यासह इतर अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते.


