Sangli Samachar

The Janshakti News

रोज येणाऱ्या अत्याचाराच्या वृत्तामागे राजकारण की निवडणुका - राज ठाकरे यांचा थेट प्रश्न !


| सांगली समाचार वृत्त |
नागपूर - दि. २६ ऑगस्ट २०२४
बदलापूर प्रकरण उजेडात आल्यानंतर महाराष्ट्रात सातत्याने महिला आणि चिमुकल्या वरील अत्याचारांच्या घटना समोर येत आहेत. फक्त लैंगिक शोषणच नव्हे तर त्यानंतर मुलींची हत्याही केली जात आहे या घटनांमध्ये अचानक वाढ का झाली ? यामध्ये कोणते राजकारण आहे का ? असा थेट सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे ते नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणी राज ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी ट्विट करून सरकारला धारेवर धरलं होतं. आंदोलकाला अटक होऊ शकते, पण आरोपीला अटक करायला वेळ का लागला ? असा सवाल करून त्यांनी याबाबत संशय व्यक्त करताना, 2017 पासून महाराष्ट्रातील महिला अत्याचारा विरोधात आकडेवारीच पत्रकार समोर मांडली.

यावेळेस बोलताना राज ठाकरे पुढे म्हणाले की, महिला वरील अत्याचारात वाढ होत आहे. मुंबईमध्ये महिला आणि मुलींना सुरक्षित वाटत नाही. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात महिला विरोधातील वाढता आलेख स्पष्ट केला. हुंडाबळी, विनयभंग, लैंगिक अत्याचार, अनैतिक व्यापार याबरोबरच इतर अत्याचार ही वाढलेले आहेत. 2017 पासून महाराष्ट्रात घडलेल्या अत्याचारांची आकडेवारीच राज ठाकरे यांनी सादर केली. 2017 मध्ये 4320, 2018 मध्ये 4974, 2020 मध्ये 4846, 2021 मध्ये 5954, 2022 मध्ये 7084 आणि 2023 मध्ये 7521 इतक्या बलात्कार प्रकरणाची नोंद पोलीस ठाण्यात आहे. 


महाराष्ट्रातील या आकडेवारीनुसार दर तासाला एक गंभीर गुन्हा नोंदवला जातो आहे. नोंद न करता घडलेले गुन्हे यापेक्षा जास्त असतील, अशी शंका राज ठाकरे यांनी व्यक्त केली. नॅशनल क्राईम ब्युरोच्या अहवालानुसार उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रात तिला विरोधातील गुन्हे समोर आले आहेत अशी माहिती राज ठाकरे यांनी यावेळी दिले.

आता रोज जी प्रकरणे छापून येत आहेत ते तासाला यायला पाहिजे ना ? असा सवाल करून राज ठाकरे म्हणाले की महाराष्ट्रात प्रत्येक पोलीस ठाण्यात किती गुन्हे दाखल होत आहेत. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की, इतके दिवस ते दाखवले जात का नव्हते ? करून अत्यंत दुर्दैवी आहे त्याला खेचलं पाहिजे याचं कारण आपल्याकडे कठोर शासन, कठोर कायदा होत नाही. निर्भया प्रकरणातील आरोपी कळला, बलात्कार कसा झाला हेही कळलं पण फाशी किती वर्षांनी झाली ? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

यावेळी राज ठाकरे यांनी बंदची भूमिका घेतलेल्या महाआघाडीवर टीका केले. यांच्या काळातही अत्याचार होतच होते आजही ते होत आहेत. पण याला प्रसिद्धी जास्त मिळत आहे. यामागे काही षडयंत्र आहे का याचा तपास व्हायला हवा अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. आपल्याला विषय संपवायचा आहे या गोष्टी महाराष्ट्रात पुन्हा होऊ नयेत. निवडणुका आल्या की सरकारला बदनाम करा, विरोधकांची भूमिका आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.