Sangli Samachar

The Janshakti News

जयश्रीताईं पाटील यांची विधानसभा निवडणूकीतील उमेदवारी मदनभाऊ पाटील युवा मंचने केली प्रतिष्ठेची !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ ऑगस्ट २०२४
सांगली विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी महायुती असो किंवा महाआघाडी दोहोतील नेत्यांसाठी डोकेदुखीची ठरत आहे. महायुतीकडून विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना उमेदवारी देण्याचे घाटत असतानाच, पप्पू डोंगरे, माजी आमदार नितीन शिंदे यांच्यासह अनेकांनी उमेदवारीसाठी देव पाण्यात ठेवले आहेत. तर इकडे महाआघाडीतही इच्छुकांची संख्या वाढत आहे. परंतु सर्वाधिक चुरस आहे ती जयश्रीताई आणि पृथ्वीराजबाबा या दोन पाटलांत...

परंतु जयश्रीताई पाटील यांच्यापेक्षा ही उमेदवारी मदन भाऊ पाटील युवा मंचने अधिक प्रतिष्ठेची केलेली दिसत आहे. काल एका पत्रकार बैठकीमध्ये माजी नगरसेवकांनी पृथ्वीराज बाबांना भावनिक साद घातली आहे. 2019 साली स्व. मदन भाऊ पाटील तस्वीरीसमोर पृथ्वीराज बाबा पाटील यांनी, 2024 साली जयश्रीताई याच उमेदवार असतील अशी शपथ घेतली होती. त्यामुळे त्यांनी दिलेला शब्द पाळावा, असे या माजी नगरसेवकांनी म्हटले आहे. या पत्रकार बैठकीत सांगली महापालिकेचे माजी सभापती संतोष पाटील, माजी नगरसेवक अभिजीत भोसले यांच्यासह पानपट्टी असोसिएशनचे नेते अजित सूर्यवंशी आणि अन्य महत्वाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


पृथ्वीराज बाबा पाटील यांच्याप्रमाणेच जयश्री ते पाटील यांनीही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. सांगलीत मदन भाऊ पाटील युवा मंचची ताकद मोठी मानली जाते. त्यामुळे अद्याप पृथ्वीराजबाबा पाटील व जयश्रीताई पाटील या दोघांच्या संभाव्य उमेदवारी बाबत वरिष्ठ नेत्यांनी आपली भूमिका जाहीर केलेले नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाला उमेदवारी मिळणार यावर येथील यशाअपयशाचे गणित ठरणार आहे.