Sangli Samachar

The Janshakti News

जिल्ह्याचा नावलौकिक वाढवण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार यांचे आवाहन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ ऑगस्ट २०२४
एक ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या महसूल पंधरवड्या निमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहेत. मात्र हे उपक्रम राबविले जात असताना न्याय मागणीसाठी आलेल्या तक्रारकर त्यांचे समाधान ही सर्वात मोठी बाब आहे आणि यासाठी अधिकाऱ्यांनी कार्यरत राहावे आपल्या लोकाभिमुख कार्यशैलीने जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.

एक ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या महसूल बनवण्याचा आढावा घेण्यासाठी . डॉ. पुलकुंडवार सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास संबोधित करताना डॉ. पुलकुंडवार बोलत होते.


महसूल विभागाच्या कार्यशैलीवरच त्या त्या जिल्ह्याची प्रतिमा ठरते या प्रतिमेच्या जपणुकीसाठी सर्वांनी कार्यरत राहावे, असे सांगून डॉ. पुलकुंडवार यांनी महसूल पंधरवड्या निमित्त जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे त्याने कौतुक केले. 

याप्रसंगी आयुक्तांच्या हस्ते तलाठी भरती परीक्षेत माजी सैनिक प्रवर्गातून निवड झालेले सर्वश्री अरुण माळी, सचिन कुंभा,र वसंत करांडे, बाबासाहेब माळी, दादासाहेब खोबारे यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. तर सलोखा योजनेअंतर्गत लाभ मिळालेले शेतकरी सर्वश्री लक्ष्मण पाटील, धनाजी पाटील, संभाजी माने, बाळकृष्ण माने यांना सातबारा उतारा देण्यात आला. तर ई-महाभुमी अंतर्गत मंडल अधिकारी श्रीमती वैशाली वाले, अमोल सानप व तलाठी शिवाजी सकटे यांना लॅपटॉप व प्रिंटर प्रदान करण्यात आले.


यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पुणे विभागीय उपाआयुक्त (सामान्य प्रशासन) वर्षा उंटवाल-लड्डा, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, विक्रम बांदल, रणजीत भोसले, उत्तम दिघे, अजय कुमार नष्टे, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे यांच्यासह सर्व तहसीलदार आणि महसूल विभागातील अधिकारी उपस्थित होते.