Sangli Samachar

The Janshakti News

माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त काँग्रेसचे अभिवादन !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २१ ऑगस्ट २०२४
भारतरत्न व माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त आज काँग्रेस भवनमध्ये सांगली शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. विजया पृथ्वीराज पाटील आणि विश्वासबापू पाटील यांच्या हस्ते स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

प्रारंभी जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष स्व.आनंदराव मोहिते यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

स्वागत व प्रास्ताविकात अजित ढोले  आणि मौलाली वंटमुरे यांनी स्व. राजीव गांधी यांनी संगणक, दूरसंचार व विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भरीव कामगिरी केली असून राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभाव व देशाच्या चौफेर विकासासाठी बलिदान दिले आहे. असे प्रतिपादन केले. 


यावेळी सौ. विजया पृथ्वीराज पाटील, विश्वासबापू पाटील, करीमभाई मेस्त्री  किशोर शहा, मुन्ना कुरणे, बिपीन कदम, सनी धोतरे, श्रीकांत जाधव वकील, संजय मेंढे, सी. आर. सांगलीकर, डॉ. सिकंदर जमादार, प्रकाश मुळके,  सचिन चव्हाण, अजित ढोले, मौलाली वंटमुरे, अजय देशमुख, अल्लाबक्ष मुल्ला, भारती व दीक्षितकुमार भगत,पैगंबर शेख, अरुण पळसुले, विठ्ठलराव काळे, अशोकसिंग रजपूत, प्रकाश जगताप, संग्राम पाटील, धनाजी जाधव, बाबगोंडा पाटील, मुफीत कोळेकर, गुलाबराव भोसले, भाऊसाहेब पवार वकील, सुवर्णा पाटील, सीमा कुलकर्णी, मिना शिंदे, दिनकर पाटील, जहीर मुजावर व सांगली शहर जिल्हा व ग्रामीण काँग्रेस कमिटी पदाधिकारी, सदस्य, सर्व फ्रंटल व विभागाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.