Sangli Samachar

The Janshakti News

ज्या शेतकऱ्यांना अद्यापही त्यांच्या चारा नाही, त्यांच्यासाठी महानगरपालिकेमार्फत चारा !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ ऑगस्ट २०२४
ज्या शेतकऱ्यांना अद्यापही त्यांच्या स्वतःच्या शेतात चारा उपलब्ध होत नाही, त्यांच्यासाठी महानगरपालिकेमार्फत चारा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गरजवंतांनी महानगरपालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयामध्ये संपर्क करावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

कृष्णा नदीचा महापूर परिस्थिती लक्षात घेऊन सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमार्फत प्रामुख्याने कृष्णा घाट मिरज येथील कुरणे मळा, सांगली येथील मगरमच्छ कॉलनी व परिसरामधील जनावरे नागरिकांच्या मदतीने खालील ठिकाणी स्थलांतरित केली होती.


मिरज येथील कृष्णा घाट परिसरातील जनावरे बाजार समिती मिरज या आवारात स्थलांतरित करण्यात आली होती. या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने ओला आणि सुखा चाऱ्याची व्यवस्था मोफत केलेली होती. विविध संस्थांच्या माध्यमातून महानगरपालिकेने लोकसभागातून पशुखाद्य देखील उपलब्ध करून दिलेले आहे.

मागील 10 दिवसांमध्ये दररोज सरासरी 450 जनावरांच्या चाऱ्याची सोय महानगरपालिकेमार्फत करण्यात आली होती. महापालिका वतीने जनावरांच्या चाराची सोय चांगल्या प्रकारे केल्या बद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

आता पुराची पातळी कमी झाल्यामुळे कृष्णा घाटावरील जनावरे, शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये घेऊन गेले आहेत. शेताकडे जाण्या येण्यासाठी साठी रस्ता उपलब्ध झाल्याने जनावरांच्या चाऱ्याची सोय त्यांच्याकडून करण्यात आल्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणारी चाऱ्याची सोय काल पासून बंद केलेली आहे. मात्र अद्यापही जाणार जनावरांसाठी चारा उपलब्ध होत नाही, त्यांना महापालिकेतर्फे अजूनही ओला व सुखाचा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रसिद्ध पत्रकार द्वारे जाहीर केले आहे. 

दरम्यान महापालिकेतर्फे मोठ्या जनावरांना देण्यात येणाऱ्या चाऱ्यामुळे समाधान व्यक्त होत आहे ओला व सुख्या चाऱ्यामुळे जनावरांचे होणारे हाल थांबल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.