Sangli Samachar

The Janshakti News

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये - जयंत पाटील


| सांगली समाचार वृत्त |
इस्लामपूर - दि. ६ ऑगस्ट २०२४
प्रदेशाध्यक्ष म्हणून मला राज्यभर फिरावे लागणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक माझ्या विरोधात आक्रमक झाले आहेत. मतदार संघातील माझा मतदार आपल्याबरोबर आहे तरीही कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या दिला आहे. 

आ. जयंत पाटील यांचे नेतृत्व तावून-सुलाखून निघाले आहे. अनेक कठीण प्रसंगात वाळवा मतदार संघ त्यांच्या पाठीशी ठाम उभा असल्याने एकाही विधानसभा निवडणुकीत त्याला पराभवाचा सामना करावा लागलेला नाही. परंतु आता परिस्थिती वेगळी आहे. राष्ट्रवादीतच उभी फूट पडल्याने, आणि लोकसभा निवडणुकीत पक्षाची झालेली पीछेहाट पाहता, शरद पवार गट नव्या उमेदीने विधानसभा निवडणूक केला सामोरे जाण्याच्या तयारीत आहे.

प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांच्यावर मोठे जबाबदारी आहे. त्याला महाआघाडीच्या प्रचारासाठी राज्यभर दौरा करावा लागणार आहे. अशातच सांगली लोकसभा मतदारसंघात त्यांनी घेतलेली भूमिका वादाच्या केंद्रस्थानी राहिली. त्यामुळे विशाल पाटील यांनी त्यांच्या विरोधात दंड थोपटले असून, वाळवा मतदार संघातील वसंतदादा प्रेमी, त्याच अजित पवार गट, भाजपा, आणि शिवसेना ठाकरे गट जयंत पाटील यांच्या विरोधात एक संघपणे आघाडी उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्यांदाच जयंत पाटील यांना विधानसभा निवडणुकीत घरच्या मैदानावर मोठा धोका निर्माण झाला आहे.


या पार्श्वभूमीवर इस्लामपूर येथे वाळवा तालुका राष्ट्रीय साखर कामगार संघाच्या वतीने राजारामबापू पाटील शिक्षण व उद्योग समूहातील कर्मचाऱ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला, या मेळाव्याला संबोधित करताना जयंत पाटील यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, राज्यातील वाढत्या राजकीय प्रभावातून राज्यात सत्ता परिवर्तन अटळ असून महाआघाडीचेच सत्ता यावेळी येणार आहे. परंतु आपण गाफील राहून चालणार नाही. रात्र वैद्याची आहे त्यामुळे डोळ्यात तेल घालून प्रत्येकाने आपण स्वतःच निवडणुकीला उभे आहोत असे समजून निवडणुकीस सामोरे गेले पाहिजे, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.

 या मेळाव्यासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार. मानसिंगराव नाईक, राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीकदादा पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, राजारामबापू सहकारी दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील, कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव आर. डी. सावंत, महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस शंकरराव भोसले, साखर कामगार संघाचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, कार्याध्यक्ष तानाजीराव खराडे यांच्यासह सांगली जिल्ह्यातील आणि शिराळा, वाळवा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.