Sangli Samachar

The Janshakti News

हरिपूरमध्ये दोन बंगले फोडून 40 तोळे सोन्यासह दोन लाख रुपये लंपास, नागरिकात घबराट !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ ऑगस्ट २०२४
हरिपूर परिसरातील दोन बंगले रविवारी मध्यरात्रीच्या समोरच फोडून अज्ञात चोरट्यानी 40 तोळे सोने आणि रोख दोन लाख रुपये असा ऐवज लंपास करून पोबारा केला आहे. तसेच परिसरातील दोन मंदिरात ही चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेतली. . सुमारे दोन तास चोरट्यांचा माघ करीत श्वास या परिसरातच घुटमळल्याने चोरट्यांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की प्रशांत अडसूळ हे खाजगी कंपनीत कार्यरत आहेत त्यांचे वडील प्रदीप कुमार हे आजारी असल्याने त्यांना मिरज येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे त्यामुळे घरातील सर्वजण रविवारी रात्री बंगल्यास कुलूप लावून रुग्णालयात गेले होते. याचा फायदा घेत दोन ते तीन चोरट्याने अडसूळ यांच्या बंगल्याची कधी कोयंडा उचकटून हात प्रवेश केला व लोखंडी कपाटात असलेले सुमारे 40 तोळ्याचे सोन्याचे दागिने चांदी रोख दोन लाख रुपये घेऊन पोबारा केला. परिसरातील आणखीन एक बंगला चोरट्यांनी फोडला असला तरी त्या संदर्भात अद्याप पोलिसात नोंद करण्यात आलेली नाही. याप्रकरणी प्रशांत प्रदीप कुमार अडसूळ, (रा. पॅराडाईज बंगला सुमंगल पार्क हरिपूर) यांनी ग्रामीण पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. 


जाता जाता चोरट्यांनी हरिपूर रोडवरील गोंदवलेकर महाराज मठ आणि गजानन महाराज मंदिर येथेही चोरीचा प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना यश आले नाही त्यामुळे चोरटे तेथून पसार झाले. चोरीची घटना लक्षात आल्यानंतर प्रदीप कुमार अडसूळ यांनी तातडीने पोलीस ठाण्याचे संपर्क साधून या घटनेचे कल्पना दिली. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण चे सतीश शिंदे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली. यावेळी पोलिसांच्या श्वान पदके पाचारण करण्यात आले होते. या शहरांनी अड घरापासून गोंदवलेकर महाराज मठापर्यंत माग काढला परंतु नंतर ते याच परिसरात घोटाळे रविवारी मध्यरात्री एकाच ठिकाणी चार ठिकाणी चोरी झाल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान या ठिकाणच्या सीसीटीव्ही मध्ये दोन ते तीन चोरटे दिसून येत आहेत. ग्रामीण पोलिसांनी याबाबतचा गुन्हा दाखल केला असून दोन पोलीस पथके चोरट्यांच्या शोधार्थ पाठवण्यात आले आहेत.