Sangli Samachar

The Janshakti News

खेळता खेळता कापडी बेल्टचा गळफास लागल्याने सांगलीत बालिकेचा दुर्दैवी अंत !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ ऑगस्ट २०२४
सांगली मधील सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील सावंत प्लॉटमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील अंजली नितीन खांडेकर या सहा वर्षाच्या बालिकेचा खेळताना कापडी बेल्टचा गळफास बसल्याने दुर्दैवी अंत झाला. . दुपारी चार च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

चिमुरडीचा मृत्यू संशयास्पद तरी नाही ना या दृष्टीने पोलिसांनी दीड तास चौकशी केल्यानंतर वैद्यकीय तपासणीत खेळण्याच्या कापडी पट्टीने गळफास लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.


याबाबत अधिक माहिती अशी की सिविल 40 असलेल्या सावंत प्लॉटमध्ये खांडेकर कुटुंब राहते. नितीन खांडेकर हे येथील मार्केट यार्डमध्ये हमाली करतात. त्यांना अंजली आणि दोन वर्षाचा एक मुलगा आहे. अंजली ही वसंत प्राथमिक शाळेमध्ये पहिलीच्या वर्गात शिकते. दुपारी शाळा सुटल्यानंतर ती घरी आली, तेव्हा घरात तिची आई छोटा भाऊ आणि आजी असे चौघेजण होते.

अंजलीच्या आईने तिला टीव्हीवरील कार्टून शो लावून दिला व ती आतील खोलीत असलेल्या छोट्या मुलाकडे लक्ष देण्यासाठी गेली होती. काही वेळाने बाहेर आल्यानंतर अंजली तेथील खुंटीला कापडी बेल्ट ने गळफास लागलेल्या स्थितीत आढळली. या घटनेने हादरलेल्या आईने हंबरडा फोडला. तेव्हा शेजारील नागरिक तेथे जमा झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. लोकांनी अंजलीला कोणती वरून खाली काढले आणि सिविल हॉस्पिटलमध्ये दाखल केले, परंतु तत्पूर्वीच अंजली चा मृत्यू झाला होता.

विश्रामबाग पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळाला भेट दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण चे निरीक्षक सतीश शिंदे यांनीही सिविल हॉस्पिटलमध्ये येऊन माहिती घेतली. जवळपास दीड तास याबाबत चौकशी केले. सावंत प्लॉट परिसरातील सीसीटीव्हीचेही फुटेज तपासले. परंतु कोणतीही आक्षेपार्य घटना समोर न आल्याने तिचा खेळता खेळताच कापडी पट्ट्याचा गळफास लागल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.