Sangli Samachar

The Janshakti News

बदलापूरच्या क्रूरकर्माला कडक शासन करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंदची हाक !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ ऑगस्ट २०२४
कोलकत्ता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर करण्यात आलेल्या अत्याचाराच्या निषेधासाठीच्या मेणबत्त्या विझत नाहीत, तोपर्यंतच महाराष्ट्रातील बदलापूर येथील निष्पाप कोवळ्या कळीला खुडण्याचे महापाप आदर्श शाळेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केले. या घटनेने हादरलेले बदलापूर आरोपीला फाशीची शिक्षा सुनवावी म्हणून सदर शाळेसमोर जमला. पैकी काही जमाव बदलापूर रेल्वे स्टेशनवर येऊन रेल्वे रोको करण्यात आले.

हे कमी की काय म्हणून बदलापूर पाठोपाठ अकोला आणि पुण्यातील शाळेत मुलींचा विनयभंग करण्यात आला. गेल्या आठवड्याभरात अशा अत्याचाराच्या घटना पाठोपाठ घडत असल्याने नागरिकातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. विरोधी पक्षांनीही सरकारला धारेवर धरणे असून, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजधान्याची मागणी करण्यात आलेली आहे.


दरम्यान पुणे जळगाव सांगली यासह यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने जोरदार निदर्शने केली. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत मंत्रालयासमोर निदर्शने केले या आंदोलनात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड विरो विजय बडे टीवर सहभागी झाले होते मात्र हा मोर्चा मंत्रालयाच्या गेटपर्यंत पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

दरम्यान महाविकास आघाडीकडून निष्क्रिय महाराष्ट्र शासनाच्या निषेधार्थ आणि बदलापूर येथील क्रूरकर्माच्या कडक कारवाईच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंदचे हात देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्व व्यापाऱ्यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, पुन्हा अशी दुर्दैवी घटना महाराष्ट्रात घडू नये यासाठी कडक बंद पाळावा असे आवाहन करण्यात आले आहे.