| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ७ ऑगस्ट २०२४
भारताचा सख्खा शेजारी असलेल्या बांगलादेशात राजकीय उद्रेक झाल्याने तेथील हिंदूंचा प्रश्न ज्वलंत बनला आहे. तेथील 19 हजार हिंदू सध्या बांगलादेशातील हिंदू द्वेष्ट्यांच्या रडारवर आहेत. हिंदूंची तेथील मंदिरे जाळण्यात येत असून, अनेकांना बेदम मारहाण केली आहे. यामध्ये काही काही हिंदूंच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याने भारत विशेष काळजी घेत आहे.
या पार्श्वभूमीवर अतिरेकी संघटना सक्रिय होण्याचा धोका असून, तेथील विस्थापितांबरोबरच भारतात शिरण्याचा त्यांचा डाव आहे. हा धोका लक्षात घेऊन गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्रमंत्री जय शंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची उच्चस्तरीय बैठक काल संसद भवनात पार पडली. यावेळी ग्रह सचिव हे तेथे उपस्थित होते.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेश उभा आडवा पेटला आहे. या आणीबाणीच्या काळात पूर्व सीमेवर काढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा समोर आव्हानांचा डोंगर उभा टाकला आहे. तेथील हिंदू भारताच्या आश्रयाकडे डोळे लावून बसले आहेत, त्यांच्या सुरक्षेचे बरोबरच विस्थापितांना भारतात आश्रय द्यायचा म्हटला तर येथील अर्थव्यवस्थेसह सुरक्षा यंत्रणावरही मोठा ताण येणार आहे. यातून मार्ग काढण्यासाठी भारतीय राज्यकर्ते सक्रिय झाले असून, विविध मार्ग आणि उपायांचा विचार विनिमय करण्यात येत आहे.
दरम्यान बांगलादेशातील हिंदू धर्मीयांना टार्गेट केले जात असून, तेथील हिंदूंची मंदिरे जाळण्यात येत आहेत, महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. शासकीय सेवेत असलेले उच्चपदस्थ, व्यावसायिक, विद्यार्थी यांना लक्ष करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळखले जाणारे नरेंद्र मोदी सरकार आता काय पावले उचलते, याकडे भारत व बांगलादेशातील हिंदूवाद्यांबरोबरच जगाचे लक्ष लागून राहिले आहे.