Sangli Samachar

The Janshakti News

डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना संरक्षण द्या, आ. सुधीरदादा गाडगीळ यांची मागणी !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ ऑगस्ट २०२४
राज्यातील सरकारी तसेच निमसरकारी इस्पितळातील डॉक्टर्स आणि त्यांच्या सहकारी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना शासनाने तातडीने संपूर्ण संरक्षण द्यावे, अशी मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात आमदार गाडगीळ यांनी डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्यावर होणारे हल्ले अथवा त्यांना दाखवली जाणारी दहशत, अशा प्रकाराबाबत तातडीने पोलीस कारवाई व्हावी अशी ही मागणी त्यांनी केली आहे.

कोलकत्ता येथील शासकीय इस्पितळातील माणूस केला काळीमा फासणाऱ्या घटने संदर्भात आमदार गाडगीळ यांनी महाराष्ट्रातील सर्व सरकारी, निमसरकारी तसेच खाजगी इस्पितळातील डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाची व त्यांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. कोलकत्ता येथे घडलेल्या दुर्घटनेसारखा प्रकार, आपल्या राज्यात कुठेही होऊ नये म्हणून शासनाने दक्षता घ्यावी, अशी ही विनंती त्यांनी नामदार फडणवीस यांना केले आहे. कोलकत्ता येथील दुर्घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून, डॉक्टरांच्या देशव्यापी आंदोलनास आपला पूर्ण पाठिंबा आ. गाडगीळ यांनी जाहीर केला.


ना. फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात आ. गाडगीळ यांनी म्हटले आहे की, डॉक्टर्स आणि त्यांचे सहकारी वैद्यकीय कर्मचारी हे रुग्णसेवेमध्ये आपले जीवन व्यतीत करीत असतात. स्वतःच्या आरोग्याचा आणि स्वतःच्या वैयक्तिक जीवनाचा विचार न करता, डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी हे रुग्णांच्या सेवेमध्ये सतत कार्यरत असतात. याचा प्रत्यय आपल्याला कोरोनासारख्या साथीच्या काळात आणि अन्य वेळीही आला आहे. परंतु हे डॉक्टर्स आणि त्यांचे सहकारी कर्मचारी यांचे जीवनच अनेकदा धोक्यात येत असल्याचे दिसून येते. 
 
कोलकत्ता येथील गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, घृणास्पद आणि निषेधार्ह अशी आहे. त्या संदर्भात आता माननीय हायकोर्टाच्या निर्णयानुसार सीबीआय चौकशी करीत आहे, ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी गोष्ट आहे. परंतु त्या ग्रहणास्पद आणि निषेधार्य घटनेतील सर्व दोषींवर तातडीने अत्यंत कठोर कारवाई केली जावी अशी केवळ डॉक्टर्स त्यांचे सहकारीच नव्हे, तर तमाम नागरिकांची तीव्र अपेक्षा आहे. असेही हा गाडगीळ यांनी आपल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.